सोलापूर : दक्षिण तालुक्यातील निवडून आलेल्या नूतन पंचायत सदस्यांचा युवा नेते मनिष देशमुख यांनी सत्कार करत त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा सोमवारी निकाल लागला. यामध्ये दक्षिण तालुक्यातील कुंभारी, होटगी, होटगी स्टेशन या गावात भाजपने वर्चस्व मिळवले. गुंजेगाव, वडकबाळ या ग्रामंपाचयतीमध्ये भाजपाचे सदस्य निवडून आले. त्यांचा मनिष देशमुख यांनी सत्कार केला. नूतन सदस्यांनी गावाच्या विकासासाठी झटून काम करावे, पक्ष आणि आ. सुभाष देशमुख कायम तुमच्या पाठिशी राहतील, असे आश्वासन दिले. यावेळी बाळासाहेब पाटील, सुरेश पुजारी, जगन्नाथ गायकवाड व यांच्यासह नूतन पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.