अमोल शिंदे महापालिकेतील विरोधी पक्षनेते
सोलापूर : काँग्रेसमध्ये महापौर तसेच पक्षनेते आदी पदे भोगल्यानंतर शिवसेनेत प्रवेश केलेले तसेच विधानसभेची शिवसेनेशी बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढविलेले आणि गेली चार वर्ष महापालिकेत शिवसेनेकडून विरोधी पक्षनेते पद सांभाळणारे महेश कोठे आता राष्ट्रवादी चे घड्याळ हातात बांधणार आहेत .ते शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार असल्यामुळे मूळ शिवसैनिकांमध्ये आनंदोत्सव सुरू आहे तर राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये कोठे मुंबई मध्ये राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे तर या सर्व घडामोडींमुळे बऱ्याच दिवसापासून वेटिंग वर असलेल्या अमोल शिंदे यांना महापालिकेतील विरोधी पक्षनेते पद मिळाले आहेत. एम आय एम चे नगरसेवक देखील राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करणार आहेत तर दुसरीकडे कोठे बरोबर राष्ट्रवादीत जाणार कोण याबाबत देखील उत्सुकता कायम आहे या सर्व घटना पुढील वर्षी होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सुरू आहेत.