राज्यातील 310 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून सोलापूर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 11 तालुके दुष्काळी तालुके म्हणून शासनाने जाहीर केले आहेत. अद्याप केंद्र सरकारची मदत आली नसून मुख्यमंत्र्यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक शेतकऱ्यांना पाच हजार रुपये देण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील सहा लाख 66 हजार शेतकरी पात्र झाले होते. यापैकी सहा लाख 1919 एवढ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति पाच हजार प्रमाणे 300 कोटी 95 लाख रुपये जमा झाले आहेत.
अजूनही पात्र झालेले ६६३८८ शेतकरी निधी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. काहींचे ई केवायसी, फार्मर आयडी तसेच कागदपत्रांमध्ये तफावत असल्यामुळे ही रक्कम प्रलंबित असून त्यांना देखील हा निधी लवकरात लवकर मिळवून देण्याचे प्रयत्न असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी सांगितले.










