• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कार्तिकी यात्रा कालावधीत एकाही वारकऱ्याची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Yes News Marathi by Yes News Marathi
November 19, 2026
in मुख्य बातमी
0
कार्तिकी वारीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पंढरपूरातील सुविधांची पाहणी
0
SHARES
0
VIEWS

जिल्हा प्रशासनाने कार्तिकी वारीचे नियोजन चांगले केलेले असून सर्व विभागांनी परस्परात समन्वय ठेवून वारी यशस्वी करावी

पंढरपूर नगरपरिषदेला वारकऱ्यांना सोयी सुविधा देण्यासाठी नगर विकास विभागाकडून पाच कोटीचा निधी वितरित करण्यात आला आहे

भक्ती सागरसह इतर सर्व ठिकाणी वारकऱ्यांसाठी सुविधा निर्माण करण्यासाठी नगर विकास विभागाकडून निधी उपलब्ध करणार

यात्रा कालावधीत भाविकांना दहा लाख पाणी बॉटलचे मोफत वितरण होणार

पंढरपूर : कार्तिकी वारीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने वारकऱ्यांसाठी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. सर्वसामान्य वारकरी भाविक हा आपला खरा व्हीआयपी आहे. त्यामुळे त्याचे समाधान झाले पाहिजे. सर्व सुविधांसह दर्शन वेळेत झाले पाहिजे. त्यामुळे प्रशासनाने यात्रा कालावधीत एकाही वारकऱ्याची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी व आवश्यक त्या सर्व सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध कराव्यात. त्यासाठी आवश्यक असलेला निधी नगर विकास विभागाच्या माध्यमातून तात्काळ उपलब्ध करण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

पंढरपूर शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात आयोजित कार्तिकी वारी 2026 च्या अनुषंगाने आढावा बैठकीत ते मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, आमदार राजू खरे, आमदार अभिजीत पाटील, उत्तम जानकर, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक अभिजीत आवटी, नगराध्यक्ष प्रणिती भालके, मुख्याधिकारी महेश रोकडे, उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष कोपुरवाड, महावितरण चे अधीक्षक अभियंता सुनील माने, प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन, जिल्हा पुरवठा अधिकारी ओंकार पडोळे, मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, येथे येणाऱ्या वारकरी, भाविकांना समाधान मिळाले पाहिजे. ही वारी निर्मल व स्वच्छ असली पाहिजे. वारकरी हाच व्हीआयपी असल्याने आपण व्हीआयपी दर्शन बंद केलेले आहे. यात्रा कालावधीत वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे त्रास झाला नाही पाहिजे. पोलीस विभागानेही अत्यंत चोखपणे बंदोबस्त ठेवावा. वीज वितरण कंपनीने संपूर्ण यात्रा कालावधीत वीज पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी, त्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ उपलब्ध ठेवावे, असे त्यांनी सूचित केले.

राष्ट्रीय महामार्गाचे अधिकाऱ्यांनी शहरातून जाणारा महामार्गाच्या रस्त्यावर धूळ राहणार नाही यासाठी तात्पुरते डांबरीकरण करून घ्यावे. महामार्गाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे, कामाची गती वाढवून रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करण्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले. येथे येणाऱ्यांना भाविकांना स्वच्छतेबरोबरच शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध झाले पाहिजे त्या दृष्टीने काळजी घ्यावी तसेच दहा लाख पाणी बॉटल उपलब्ध झालेल्या आहेत, त्याचे मोफत वितरण सुरू झालेले आहे. आवश्यकता पडल्यास अधिक पाणी बॉटल उपलब्ध करून घ्याव्यात, असेही त्यांनी सूचित केले.
पंढरपूर शहरात वारकऱ्यांसाठी सुविधा निर्माण करण्यासाठी पुढील विविध प्रकल्पासाठी नगर विकास विभागाकडून पाहिजे तेवढा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्या पद्धतीने प्रशासनाने कामे करून घ्यावी. 65 एकरचे प्लॉटचे काँक्रिटी करून करून घ्यावे त्या ठिकाणी वृक्ष लागवड ही करावी असे त्यांनी सांगितले. तसेच संपूर्ण यात्रा कालावधीत सर्व शासकीय यंत्रणा अशाच पद्धतीने कार्यान्वित राहील व वारकऱ्यांना सेवा देईल याची दक्षता घ्यावी असेही शिंदे यांनी सुचित केले. पंढरपूर नगरपरिषदेसाठी स्वीपर मशीन तसेच जेटिंग मशीन उपलब्ध करून देण्यात आलेले आहे असे त्यांनी सांगितले.

प्रारंभी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने पंढरपूर शहरात येणाऱ्या वारकरी भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी सुविधांची माहिती दिली. स्वच्छतेसाठी पंढरपूर नगरपालिकेचे 1200 कर्मचारी कार्यरत असून 1500 शौचालयाची सुविधा उपलब्ध केलेली आहे. नगरपालिकेने अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेतलेले आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने 50 लाखाचे औषधे खरेदी करण्यात आलेली आहे. आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे. वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रशासन सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. तर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पोलीस विभाग वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी सदैव कार्यरत असल्याचे सांगितले. गर्दीवर नियंत्रणासाठी वाहतुकीचे सुयोग्य नियोजन केल्याचे माहिती त्यांनी दिली तसेच संपूर्ण यात्रा कालावधीत पोलीस विभागाचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Previous Post

कार्तिकी वारीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पंढरपूरातील सुविधांची पाहणी

Next Post

राज्यात ३४ लाखांहून अधिक भूजल पुनर्भरण संरचनांच्या निर्मितीचे उद्दिष्ट मे २०२७ पर्यंत पूर्ण करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Related Posts

राज्यात ३४ लाखांहून अधिक भूजल पुनर्भरण संरचनांच्या निर्मितीचे उद्दिष्ट मे २०२७ पर्यंत पूर्ण करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्य बातमी

शेतकऱ्यांनी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे
मुख्य बातमी

शेतकऱ्यांनी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे

November 19, 2026
सोलापूरच्या ऊसदराचा तिढा सोडवण्यासाठी राजू शेट्टी उद्या पंढरपुरात!
मुख्य बातमी

ऊसदराचा तिढा कायम; २४ नोव्हेंबरला सोलापूर-पुणे महामार्ग बेमुदत रोखणार, राजू शेट्टींचा इशारा

November 19, 2026
डीसीसी बँकेत घराणेशाही, भाजपचाच होणार चेअरमन, भाजप पॅनलला मोहिते पाटलांचे चॅलेंज…!
मुख्य बातमी

डीसीसी बँकेत घराणेशाही, भाजपचाच होणार चेअरमन, भाजप पॅनलला मोहिते पाटलांचे चॅलेंज…!

November 18, 2026
आ. कल्याणशेट्टी,आ.राऊत यांच्यासह 10 बिनविरोध, नऊ जागांसाठी 22 जण रिंगणात
मुख्य बातमी

आ. कल्याणशेट्टी,आ.राऊत यांच्यासह 10 बिनविरोध, नऊ जागांसाठी 22 जण रिंगणात

November 17, 2026
Next Post
राज्यात ३४ लाखांहून अधिक भूजल पुनर्भरण संरचनांच्या निर्मितीचे उद्दिष्ट मे २०२७ पर्यंत पूर्ण करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यात ३४ लाखांहून अधिक भूजल पुनर्भरण संरचनांच्या निर्मितीचे उद्दिष्ट मे २०२७ पर्यंत पूर्ण करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज्यात ३४ लाखांहून अधिक भूजल पुनर्भरण संरचनांच्या निर्मितीचे उद्दिष्ट मे २०२७ पर्यंत पूर्ण करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यात ३४ लाखांहून अधिक भूजल पुनर्भरण संरचनांच्या निर्मितीचे उद्दिष्ट मे २०२७ पर्यंत पूर्ण करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

November 19, 2026
कार्तिकी वारीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पंढरपूरातील सुविधांची पाहणी

कार्तिकी यात्रा कालावधीत एकाही वारकऱ्याची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

November 19, 2026
कार्तिकी वारीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पंढरपूरातील सुविधांची पाहणी

कार्तिकी वारीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पंढरपूरातील सुविधांची पाहणी

November 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026