सोलापूर : महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), सोलापूर येथे उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांचा पदवीदान समारंभ शनिवार, २१ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता संस्थेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे.
या समारंभास खासदार प्रणिती शिंदे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच उद्योजक तथा आयटीआय संस्था व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धनंजय गोडबोले यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
समारंभात विविध व्यवसायांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमास २०२६ मध्ये उत्तीर्ण झालेले सर्व प्रशिक्षणार्थी, त्यांचे पालक, माजी विद्यार्थी आणि स्थानिक उद्योजकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य एम. एम. बिडकर व कर्मचारी वृंद यांनी केले आहे.










