• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सापटणे येथे श्रमदानातून वनराई बंधाऱ्याची उभारणी

Yes News Marathi by Yes News Marathi
November 2, 2026
in मुख्य बातमी
0
सापटणे येथे श्रमदानातून वनराई बंधाऱ्याची उभारणी
0
SHARES
0
VIEWS

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या अधिकारी व ग्रामस्थांचा जलसंवर्धनासाठी पुढाकार; लोकसहभागातून जलचळवळ उभारण्याचे आवाहन

सोलापूर : पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरविणे, भूजल पातळीत वाढ करणे आणि गावातील पाणीपुरवठ्याचे स्रोत सक्षम करण्याच्या उद्देशाने भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा (जीएसडीए), सोलापूर कार्यालय आणि सापटणे (टें.), ता. माढा येथील ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने वनराई बंधारा उभारणीचा श्रमदान उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमातून जलसंवर्धनासाठी लोकसहभागाचे महत्त्व तसेच इतरांसमोर एक आदर्श सापटणे ग्रामस्थांनी ठेवला आहे, अशी माहिती भोजनचे वरिष्ठ भू वैज्ञानिक डॉ. मुस्ताक शेख यांनी दिली आहे.


सोलापूर जिल्ह्याला पर्जन्यमानातील अनिश्चितता आणि पाणीटंचाईच्या समस्यांना वारंवार सामोरे जावे लागते. पावसाळ्यात उपलब्ध होणारे पाणी वाहून जाण्याऐवजी त्याचे स्थानिक पातळीवर संचयन करून भूजल पुनर्भरण करणे आवश्यक आहे. याच उद्देशाने सापटणे येथे लोकसहभागातून वनराई बंधारा उभारण्यात आला. या उपक्रमांतर्गत सिमेंटच्या रिकाम्या गोण्यांमध्ये वाळू व माती भरून त्यांची योग्य रचनेत मांडणी करत वनराई बंधारा बांधण्यात आला. स्थानिक पातळीवर उपलब्ध साधनसामग्रीचा वापर करून कमी खर्चात प्रभावी जलसंधारणाची कामे करता येतात, हे या उपक्रमातून दाखवून देण्यात आले. विशेष म्हणजे, ग्रामस्थांनी प्रत्यक्ष श्रमदान करून जलसंवर्धनाच्या कार्यात सक्रिय सहभाग नोंदविला.


वनराई बंधाऱ्यामुळे पाण्याचा प्रवाह व वेग नियंत्रित होण्यास तसेच पाणी जमिनीत मुरण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होण्यास मदत होते. परिणामी, योग्य भौगोलिक व भूजलशास्त्रीय परिस्थितीत अशा बंधाऱ्यांमुळे स्थानिक भूजल पुनर्भरणाला चालना मिळू शकते. सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या विहिरींच्या पाणलोट क्षेत्रात अशा प्रकारची जलसंधारणाची कामे केल्यास गावाच्या जलसुरक्षेला बळकटी मिळू शकते. गावातील सार्वजनिक विहिरींच्या परिसरातील नैसर्गिक नाले, ओढे आणि पाण्याच्या प्रवाहांचा अभ्यास करून योग्य ठिकाणी वनराई बंधारे उभारणे आवश्यक आहे. त्यासाठी भूगर्भीय परिस्थिती, पाण्याच्या प्रवाहाची दिशा आणि आवश्यक तांत्रिक निकषांचा विचार करणे गरजेचे असल्याचे या उपक्रमातून स्पष्ट करण्यात आले.


महाराष्ट्रातील गावांना लोकसहभागातून जलसंवर्धनाची चळवळ उभारण्याचे आवाहन
सापटणे येथील हा उपक्रम महाराष्ट्रातील इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो. जलसंधारणासाठी केवळ शासकीय निधी व यंत्रणेवर अवलंबून न राहता ग्रामपंचायत, शेतकरी, महिला बचत गट, युवक मंडळे आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन श्रमदानातून जलसंवर्धनाची लोकचळवळ उभारावी, असे आवाहन करण्यात आले.

पाण्याची समस्या ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक गावाची आणि नागरिकांची सामूहिक जबाबदारी आहे. सापटणे येथील ग्रामस्थांनी प्रत्यक्ष श्रमदानातून हा संदेश दिला आहे. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी अशा लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या जलसंधारणाच्या उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.

माढा तालुक्यातील सापटणे येथे ३१ ऑक्टोबर रोजी आयोजित या उपक्रमात वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. मुश्ताक शेख, सहाय्यक भूवैज्ञानिक डॉ. संजय साबळे, संतोष पाटील, विनायक निंबाळकर, डॉ. फरजाना बिराजदार, कनिष्ठ भूवैज्ञानिक एम. डी. नदाफ, अनिता बनसोडे व विशाल चौधरी यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

Previous Post

महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियानांतर्गत ४ नोव्हेंबर व १६ डिसेंबर रोजी लोक अदालत

Related Posts

महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियानांतर्गत ४ नोव्हेंबर व १६ डिसेंबर रोजी लोक अदालत
मुख्य बातमी

महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियानांतर्गत ४ नोव्हेंबर व १६ डिसेंबर रोजी लोक अदालत

November 2, 2026
महिला सक्षमीकरणाला बाजारपेठेची जोड; जिल्हा परिषदेत ‘रुक्मिणी दिवाळी महोत्सव २०२६’चे उत्साहात उद्घाटन
मुख्य बातमी

महिला सक्षमीकरणाला बाजारपेठेची जोड; जिल्हा परिषदेत ‘रुक्मिणी दिवाळी महोत्सव २०२६’चे उत्साहात उद्घाटन

November 2, 2026
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेतून जिल्ह्यात जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबविणार – मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन
मुख्य बातमी

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेतून जिल्ह्यात जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबविणार – मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन

November 2, 2026
केतन वोरा मित्र परिवाराच्या वतीने पाच हजार जणांना फराळाचे वाटप
मुख्य बातमी

केतन वोरा मित्र परिवाराच्या वतीने पाच हजार जणांना फराळाचे वाटप

November 2, 2026
मुख्य बातमी

MBBS च्या 5000 जागा रिक्त

November 2, 2026
पुण्यात पाऊस, सोलापूरकरांचे ढगाकडे डोळे…!
मुख्य बातमी

पुण्यात पाऊस, सोलापूरकरांचे ढगाकडे डोळे…!

November 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सापटणे येथे श्रमदानातून वनराई बंधाऱ्याची उभारणी

सापटणे येथे श्रमदानातून वनराई बंधाऱ्याची उभारणी

November 2, 2026
महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियानांतर्गत ४ नोव्हेंबर व १६ डिसेंबर रोजी लोक अदालत

महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियानांतर्गत ४ नोव्हेंबर व १६ डिसेंबर रोजी लोक अदालत

November 2, 2026
महिला सक्षमीकरणाला बाजारपेठेची जोड; जिल्हा परिषदेत ‘रुक्मिणी दिवाळी महोत्सव २०२६’चे उत्साहात उद्घाटन

महिला सक्षमीकरणाला बाजारपेठेची जोड; जिल्हा परिषदेत ‘रुक्मिणी दिवाळी महोत्सव २०२६’चे उत्साहात उद्घाटन

November 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026