महाराष्ट्रात २०२६-२७ च्या ऊस गाळप हंगामात साखर उत्पादन घटण्याचा अंदाज साखर आयुक्तालयाने व्यक्त केला आहे. सुधारित अंदाजानुसार, यंदा राज्यात ९०.१८ लाख टन साखर उत्पादन अपेक्षित असून, मागील हंगामाच्या तुलनेत सुमारे ९ लाख टनांची घट होण्याची शक्यता आहे. यापूर्वी १०२.५० लाख टन उत्पादनाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.ऑगस्टपासून पावसातील खंड, वाढलेले तापमान आणि उसाच्या गुणवत्तेवर झालेला परिणाम यामुळे साखर उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटना आहे . उसाचे क्षेत्र, प्रतिहेक्टरी उत्पादन आणि साखर उतारा यावरही प्रतिकूल हवामानाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाच्या गाळप हंगामात साखर कारखान्यांसमोर उत्पादनाचे उद्दिष्ट गाठण्याचे आव्हान असणार आहे. राज्यात 212 साखर कारखान्यांनी साखर आयुक्तांकडे गाळप प्रमाणासाठी अर्ज केले होते. 19 ऑक्टोबर च्या अहवालानुसार 131 कारखान्यांना परवाने देण्यात आले आहेत यामध्ये खाजगी 64 तर सहकारी 67 कारखान्यांचा समावेश आहे. गाळप परवाने मिळाले असले तरीही अनेकांनी कारखाने सुरू केले नाहीत तर दुसरीकडे शेतकरी संघटनांनी टनाला पाच हजार रुपये भाव द्यावा यासाठी राज्यभर ठीक ठिकाणी आंदोलनाचे हत्यार उगारले आहे. त्यामुळे यंदाचा साखर हंगाम कठीण जाणार आहे.











