सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात टंचाई निवारणार्थ दि. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी १३९ गावे व ७५२ वाड्यांमधील २ लाख ६२ हजार ४४९ नागरिकांना व ९५ हजार ९३२ पशुधनाला १३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. याशिवाय ४० विहिरी व २१ बोअर असे एकूण ६१ जलस्रोत अधिग्रहित करण्यात आले आहेत, असे माहिती जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रसाद काटकर यांनी दिली.
तालुकानिहाय मंगळवेढा ३७ गावे – ४० टँकर, सांगोला २६ गावे – ३४ टँकर, अक्कलकोट १५ गावे – ८ टँकर, माढा १४ गावे – १६ टँकर, बार्शी १३ गावे – ३ टँकर, करमाळा १२ गावे – ९ टँकर, माळशिरस १० गावे – १० टँकर, उत्तर सोलापूर ५ गावे – ७ टँकर, दक्षिण सोलापूर ५ गावे – ६ टँकर, मोहोळ २ गावे – २ टँकर असून पंढरपूर तालुक्यात एकही टँकर सुरू नाही. जिल्ह्यात टंचाईग्रस्त भागात टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.










