• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाच्या पार्श्वभूमीवर महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

Yes News Marathi by Yes News Marathi
October 6, 2026
in इतर घडामोडी
0
भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाच्या पार्श्वभूमीवर महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक
0
SHARES
1
VIEWS

निर्बीजीकरण, अँटी-रेबीज लसीकरण, तक्रार निवारणासाठी अतिरिक्त वाहने व विशेष लसीकरण मोहिमेवर भर

सोलापूर : सोलापूर शहरातील भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव तसेच कुत्रा चावण्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहराचे महापौर विनायक दादा कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली पशुवैद्यकीय विभाग व आरोग्य विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरीताई देवकर, सभागृह नेते नरेंद्रजी काळे, स्थायी समिती सभापती रंजीताताई चाकोते माजी महापौर श्रीकांचना यन्नम, नगरसेवक नारायण बनसोडे आरोग्य अधिकारी राखी माने पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश चौगुले डॉ. श्री वाळवेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

शहरातील नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणणे, कुत्रा चावण्याच्या घटना कमी करणे, निर्बीजीकरणाची कार्यवाही अधिक प्रभावी करणे आणि भटक्या कुत्र्यांचे मोठ्या प्रमाणावर अँटी-रेबीज लसीकरण करण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

पशुवैद्यकीय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्राणी जन्मनियंत्रण (Animal Birth Control – ABC) कार्यक्रमाची कार्यपद्धती, निर्बीजीकरण, पशुवैद्यकीय उपचार तसेच भटक्या कुत्र्यांचे अँटी-रेबीज लसीकरण याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली. शहरातील विविध भागांमध्ये निर्बीजीकरणाची कार्यवाही अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही

भटक्या कुत्र्यांबाबत नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर जलदगतीने कार्यवाही होण्यासाठी उपलब्ध असलेल्या डॉग कॅचिंग वाहनांची संख्या वाढविण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. पशुवैद्यकीय विभागामार्फत आणखी ४ डॉग कॅचिंग वाहने उपलब्ध करण्याची आवश्यकता मांडण्यात आली.

यावर महापौर विनायक दादा कोंड्याल यांनी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देत २ डॉग कॅचिंग वाहने खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले. अतिरिक्त वाहनांमुळे शहरातील विविध भागांमध्ये एकाच वेळी कार्यवाही करणे शक्य होऊन नागरिकांच्या तक्रारींचे निवारण अधिक जलदगतीने होण्यास मदत होणार आहे.

विशेष अँटी-रेबीज लसीकरण मोहीम

रेबीज हा प्राणघातक मात्र प्रतिबंध करता येणारा आजार असल्याने भटक्या कुत्र्यांचे मोठ्या प्रमाणावर अँटी-रेबीज लसीकरण करणे आवश्यक असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले. त्यासाठी शहरात विशेष/मास अँटी-रेबीज लसीकरण मोहीम राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली.

विभागनिहाय नियोजन करून अधिकाधिक भटक्या कुत्र्यांना लसीकरणाच्या कक्षेत आणणे, निर्बीजीकरण व लसीकरण कार्यक्रमाचा प्रभावी समन्वय साधणे तसेच संवेदनशील भागांमध्ये विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

आक्रमक व रेबीज संशयित कुत्र्यांबाबत विशेष उपाययोजना

रेबीज संशयित तसेच अत्यंत आक्रमक कुत्र्यांबाबत सुरक्षित पद्धतीने पकड, निरीक्षण, पशुवैद्यकीय तपासणी आणि लागू कायदे व नियमांनुसार पुढील कार्यवाही करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.

अशा प्रकरणांमध्ये नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देतानाच प्राणी कल्याणाच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. आवश्यक परिस्थितीत दयामरणाची कार्यवाही ही केवळ लागू कायदे, नियम व अधिकृत पशुवैद्यकीय प्रक्रियेनुसारच करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले.

कचरा व्यवस्थापन व जनजागृतीवरही भर

भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी केवळ निर्बीजीकरण करणे पुरेसे नसून निर्बीजीकरण, अँटी-रेबीज लसीकरण, तक्रार निवारण, आक्रमक कुत्र्यांवरील कायदेशीर व पशुवैद्यकीय कार्यवाही, कचरा व्यवस्थापन आणि नागरिकांमध्ये जनजागृती या सर्व उपाययोजनांचा समन्वयित पद्धतीने अवलंब करणे आवश्यक असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.

कचरा उघड्यावर पडणार नाही, यासाठी संबंधित विभागांनी प्रभावी उपाययोजना कराव्यात तसेच नागरिकांनीही कचरा रस्त्यावर अथवा उघड्यावर टाकू नये, याबाबत जनजागृती करण्याचे निर्देश देण्यात आले. कचरा व्यवस्थापनात सुधारणा झाल्यास भटक्या कुत्र्यांना सहज उपलब्ध होणाऱ्या अन्नस्रोतांवर नियंत्रण आणण्यास मदत होणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत कुत्रा चावल्यानंतर नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या अँटी-रेबीज लसीकरणाच्या सुविधेचा देखील आढावा घेण्यात आला. कुत्रा चावल्यानंतर नागरिकांनी विलंब न करता वैद्यकीय उपचार घ्यावेत, याबाबत जनजागृती करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली.

महापौर विनायक दादा कोंड्याल यांनी संबंधित विभागांना समन्वयाने काम करून भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तातडीने आणि दीर्घकालीन स्वरूपात उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

“सोलापूर शहरातील नागरिकांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राथमिकता आहे. भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी निर्बीजीकरण, अँटी-रेबीज लसीकरण, तक्रार निवारणासाठी आवश्यक यंत्रणा, कचरा व्यवस्थापन आणि जनजागृती या सर्व बाबींवर एकत्रितपणे काम करण्यात येईल. वैज्ञानिक, कायदेशीर, मानवीय आणि दीर्घकालीन उपाययोजनांच्या माध्यमातून ही समस्या प्रभावीपणे हाताळण्यासाठी महानगरपालिका प्रशासन कटिबद्ध आहे,” असे महापौर विनायक दादा कोंड्याल यांनी सांगितले.

बैठकीस महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभाग, आरोग्य विभागातील संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post

हुतात्मा स्मृती मंदिराच्या दुरुस्ती व सुविधांसाठी महापौर विनायक कोंड्याल यांनी केली पाहणी व दुरुस्ती करण्याचे दिल्या सूचना

Next Post

मोडनिंब जलजीवन मिशन कामाचे पाईप जळून खाक…दत्तनगर मधील गणपती मंदिर सापडले आगीच्या भक्षस्थानी

Related Posts

हुतात्मा स्मृती मंदिराच्या दुरुस्ती व सुविधांसाठी महापौर विनायक कोंड्याल यांनी केली पाहणी व दुरुस्ती करण्याचे दिल्या सूचना
इतर घडामोडी

हुतात्मा स्मृती मंदिराच्या दुरुस्ती व सुविधांसाठी महापौर विनायक कोंड्याल यांनी केली पाहणी व दुरुस्ती करण्याचे दिल्या सूचना

October 6, 2026
अभिजात मराठी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख : मंत्री उदय सामंत
इतर घडामोडी

अभिजात मराठी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख : मंत्री उदय सामंत

October 6, 2026
स्वाद आणि वेगवान प्रवासाचे उत्तुंग उड्डाण ; नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर हायटेक फ्लाईट किचन सुरू..
इतर घडामोडी

स्वाद आणि वेगवान प्रवासाचे उत्तुंग उड्डाण ; नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर हायटेक फ्लाईट किचन सुरू..

October 6, 2026
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतलेले 7 महत्वाचे निर्णय
इतर घडामोडी

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने घेतलेले 7 महत्वाचे निर्णय

October 6, 2026
एल निनोच्या प्रभावामुळे राज्यात 10 टक्के पाणी कपात; 16 ऑक्टोबरपासून अंमलबजावणी
इतर घडामोडी

एल निनोच्या प्रभावामुळे राज्यात 10 टक्के पाणी कपात; 16 ऑक्टोबरपासून अंमलबजावणी

October 6, 2026
‘पीएम पोषण’ योजनेद्वारे ताजे, सकस आणि पोषणमूल्ययुक्त आहार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यावर भर
इतर घडामोडी

‘पीएम पोषण’ योजनेद्वारे ताजे, सकस आणि पोषणमूल्ययुक्त आहार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यावर भर

October 6, 2026
Next Post
मोडनिंब जलजीवन मिशन कामाचे पाईप जळून खाक…दत्तनगर मधील गणपती मंदिर सापडले आगीच्या भक्षस्थानी

मोडनिंब जलजीवन मिशन कामाचे पाईप जळून खाक…दत्तनगर मधील गणपती मंदिर सापडले आगीच्या भक्षस्थानी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोडनिंब जलजीवन मिशन कामाचे पाईप जळून खाक…दत्तनगर मधील गणपती मंदिर सापडले आगीच्या भक्षस्थानी

मोडनिंब जलजीवन मिशन कामाचे पाईप जळून खाक…दत्तनगर मधील गणपती मंदिर सापडले आगीच्या भक्षस्थानी

October 6, 2026
भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाच्या पार्श्वभूमीवर महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाच्या पार्श्वभूमीवर महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

October 6, 2026
हुतात्मा स्मृती मंदिराच्या दुरुस्ती व सुविधांसाठी महापौर विनायक कोंड्याल यांनी केली पाहणी व दुरुस्ती करण्याचे दिल्या सूचना

हुतात्मा स्मृती मंदिराच्या दुरुस्ती व सुविधांसाठी महापौर विनायक कोंड्याल यांनी केली पाहणी व दुरुस्ती करण्याचे दिल्या सूचना

October 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026