सोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालयात दरमहा महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हा लोकशाही दिन ऑक्टोबर महिन्यात आयोजित करण्यात येणार नाही.
महाराष्ट्र विधानसभेच्या ३ पदवीधर व २ शिक्षक मतदारसंघांच्या द्वैवार्षिक निवडणुकीची आचारसंहिता दि. २२ सप्टेंबर २०२६ पासून लागू करण्यात आली आहे. या अनुषंगाने मा. उपसचिव,सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या दि. २२ सप्टेंबर २०२६ रोजीच्या पत्रान्वये आचारसंहिता कालावधीत जिल्हास्तरावरील लोकशाही दिनाचे आयोजन करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
त्यामुळे सोमवार, दि. ५ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येणारा जिल्हा लोकशाही दिन आयोजित केला जाणार नाही. नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी कळविले आहे.










