• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

दुष्काळी परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; शेतकऱ्यांना थेट मदत करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Yes News Marathi by Yes News Marathi
September 23, 2026
in इतर घडामोडी
0
दुष्काळी परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; शेतकऱ्यांना थेट मदत करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
0
SHARES
1
VIEWS

बार्शी तालुक्यातील धानोरे येथे सोयाबीन पिकाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

सोलापूर – राज्यातील इतर भागांप्रमाणेच सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, शेतकऱ्यांना थेट मदत करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज बार्शी तालुक्यातील धानोरे येथे नुकसानग्रस्त सोयाबीन पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार राजेंद्र राऊत, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार समाधान आवताडे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, माजी आमदार राम सातपुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुने, बार्शी चे तहसीलदार एफ. आर. शेख यांच्यासह संबंधित अधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सोलापूर जिल्ह्यात पावसाअभावी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात सरासरीच्या सुमारे 50 टक्केच पाऊस झाला असून, खरीप हंगामातील जवळपास सर्व पिकांचे नुकसान झाले आहे. धानोरेसह बार्शी तालुक्याच्या या परिसरात सुमारे 90 हजार हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पिकांचे 100 टक्के नुकसान झाले आहे. दुष्काळी परिस्थितीकडे शासन गांभीर्याने लक्ष देत असून, शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्यासाठी लवकरच शासन निर्णय (जीआर) काढण्यात येईल. मदत थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा, अन्नधान्य तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काचा प्रश्न याबाबत शासन लवकरच निर्णय घेणार आहे. आगामी काळात रब्बी हंगामासाठी पाणी उपलब्ध झाले, तर त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना आवश्यक मदत करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

उजनी धरणातील उपलब्ध पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याबाबतही शासन स्तरावर कार्यवाही करण्यात येणार आहे. पालकमंत्री गोरे व आमदार राऊत यांनी सोलापूर जिल्ह्यात पाणी आणण्यासाठी मांडलेल्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासन सकारात्मक असून, त्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, ‘फ्लड डायव्हर्शन’च्या माध्यमातून उजनी धरणात पाणी आणण्याच्या प्रस्तावावरही कार्यवाही सुरू आहे. या प्रकल्पाला जागतिक बँकेची मंजुरी मिळाली असून, त्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. या माध्यमातून उजनीत पाणी आणल्यानंतर सोलापूर जिल्ह्यासह लगतच्या मराठवाड्यातील धाराशिव, लातूर आणि बीड जिल्ह्यांनाही त्याचा लाभ मिळणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

सोलापूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसातील दीर्घ खंडामुळे शेतकऱ्यांसमोर पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा तसेच पुढील हंगामासाठी पाण्याची उपलब्धता यासारखी आव्हाने निर्माण झाली आहेत. या सर्व बाबींचा शासनाकडून सर्वंकष विचार करून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांचा शेतकऱ्यांशी संवाद
यावेळी शेतकरी दमयंती गादेकर, संध्या गरड, वंदना गादेकर, राहुल पाटील यांच्यासह नुकसानग्रस्त शेतकरी अन्य उपस्थित राहून मुख्यमंत्री महोदय यांच्यासमोर पावसा अभावी झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीबाबत आपल्या व्यथा मांडल्या तसेच शासनाकडून त्वरित मदत मिळावी अशी मागणी केली. यावेळी मुख्यमंत्री यांनी या शेतकऱ्यांची संवाद साधून त्यांना धीर दिला. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून आपल्याला लवकरात लवकर मदत दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Previous Post

चार्ज अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जनगणना प्रशिक्षण गांभीर्याने घ्यावे– जिल्हा जनगणना अधिकारी अभिजीत पाटील

Next Post

शेतकऱ्यांना सरसकट मदतीसाठी शासन प्रयत्नशील–मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Related Posts

गादेगाव जिल्हा परिषद शाळेला बालाजी अमाईन्सकडून सीएसआरअंतर्गत प्लेस्टेशन व खेळाचे साहित्य भेट
इतर घडामोडी

पुणे विभाग पदवीधर-शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची बैठक संपन्न
इतर घडामोडी

पुणे विभाग पदवीधर-शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची बैठक संपन्न

September 23, 2026
विद्यार्थी दशेतच आयुर्वेदाचा अंगीकार; निरोगी भविष्यासाठी आहार-विहाराची शिस्त आवश्यक- वैद्य राघवेंद्र नादरगी.
इतर घडामोडी

विद्यार्थी दशेतच आयुर्वेदाचा अंगीकार; निरोगी भविष्यासाठी आहार-विहाराची शिस्त आवश्यक- वैद्य राघवेंद्र नादरगी.

September 23, 2026
सोलापूर ग्रामीण पोलिसांनी कुर्डूवाडी मध्ये दहा लाखाचे एमडी ड्रग्ज पकडले, अमर मुलाणी या आरोपीला अटक
इतर घडामोडी

सोलापूर ग्रामीण पोलिसांनी कुर्डूवाडी मध्ये दहा लाखाचे एमडी ड्रग्ज पकडले, अमर मुलाणी या आरोपीला अटक

September 23, 2026
Next Post
शेतकऱ्यांना सरसकट मदतीसाठी शासन प्रयत्नशील–मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्यांना सरसकट मदतीसाठी शासन प्रयत्नशील--मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गादेगाव जिल्हा परिषद शाळेला बालाजी अमाईन्सकडून सीएसआरअंतर्गत प्लेस्टेशन व खेळाचे साहित्य भेट

गादेगाव जिल्हा परिषद शाळेला बालाजी अमाईन्सकडून सीएसआरअंतर्गत प्लेस्टेशन व खेळाचे साहित्य भेट

September 23, 2026
शेतकऱ्यांना सरसकट मदतीसाठी शासन प्रयत्नशील–मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्यांना सरसकट मदतीसाठी शासन प्रयत्नशील–मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 23, 2026
दुष्काळी परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; शेतकऱ्यांना थेट मदत करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दुष्काळी परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; शेतकऱ्यांना थेट मदत करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026