• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पुणे विभाग पदवीधर-शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची बैठक संपन्न

Yes News Marathi by Yes News Marathi
September 23, 2026
in इतर घडामोडी
0
पुणे विभाग पदवीधर-शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची बैठक संपन्न
0
SHARES
6
VIEWS

पुणे – महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर मतदार संघ आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे आदर्श आचारसंहिता तत्काळ प्रभावाने लागू झाली आहे. त्यानुसार सर्व राजकीय पक्षांनी भारत निवडणूक आयोगाच्या आचारसंहितासंबंधित निर्देशांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त शीतल तेली – उगले यांनी केले आहे. या निवडणुकीत मतदान करता यावे म्हणून नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या अंतिम दिनांकाच्या १० दिवस अगोदरपर्यंत नवीन मतदार नोंदणीसाठीच्या दाखल अर्जांवर कार्यवाही करता येईल, अशी माहितीदेखील त्यांनी दिली.

भारत निवडणूक आयोगाने या निवडणुकांची घोषणा मंगळवारी केली आहे. या निवडणूक कार्यक्रमाची व निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांची माहिती राजकीय पक्षांना देण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी विभागातील पुणे जिल्ह्यातील राजकीय पक्षांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष तर सोलापूर, सातारा, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील प्रतिनिधी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. पाचही जिल्ह्यातील जिल्हा निवडणूक प्रशासन, पोलीस प्रशासन, महानगरपालिका आदींचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.

भारत निवडणूक आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या सार्वत्रिक वा पोटनिवडणुकांसाठींच्या आचारसंहिताविषयक तरतुदी या निवडणुकीसाठीही लागू असतात, अशी माहिती देऊन विभागीय आयुक्त म्हणाल्या, या आचारसंहिता विषयक तरतुदींचे मार्गदर्शक पुस्तिका जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून तसेच आयोगाच्या आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावरून उपलब्ध होतील. विभागातील सर्व जिल्हाधिकारी हे त्या- त्या जिल्ह्यासाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत.

त्यांनी पुढे सांगितले, या निवडणुकीसाठी मतदान करता यावे यासाठी नव्याने मतदार नोंदणीची संधी सर्वसाधारणपणे २६ सप्टेंबरपर्यंत असणार आहे. यासाठीचे अर्ज पदनिर्देशित अधिकाऱ्यांकडे जमा करावेत. त्यांची यादी जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयात उपलब्ध आहे. जानेवारी २०२६ मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीनुसार पुणे विभागात ३ लाख ७ हजार ८२३ पदवीधर तर ५१ हजार ७५० शिक्षक मतदार आहेत. त्यानंतर झालेल्या मतदार नोंदणीची व नव्याने २६ सप्टेंबरपर्यंत होणाऱ्या मतदार नोंदणीनुसार मतदार संख्येत बदल होणार असून त्याप्रमाणे मतदारांना मतदान करता येणार आहे.

या निवडणूकीतील मतदान मतपत्रिकेद्वारे पसंतीक्रम नोंदवून करण्यात येते. त्यादृष्टीने निवडणूक प्रशासन जनजागृती करत आहे. राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी नामनिर्देशन दाखल करताना घ्यावयाची काळजी, छाननी, निवडणूक खर्चावरील मर्यादा आदींचे पालन करावे. त्याबाबत सर्व सूचना आयोगाच्या मार्गदर्शक पुस्तिकांमध्ये उपलब्ध आहेत, त्यानुसार कार्यवाही करावी, असे आवाहनही तेली-उगले यांनी केले.

यावेळी राजकीय पक्षांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन विभागीय आयुक्तांनी केले.

असा आहे निवडणूक कार्यक्रम:
निवडणुकीची अधिसूचना २९ सप्टेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर, अर्जांची छाननी ७ ऑक्टोबर, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ९ ऑक्टोबर २०२६ आहे. मतदान २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत होईल. मतमोजणी २७ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार असून, निवडणूक प्रक्रिया ३१ ऑक्टोबर २०२६ पूर्वी पूर्ण केली जाणार आहे.

Previous Post

विद्यार्थी दशेतच आयुर्वेदाचा अंगीकार; निरोगी भविष्यासाठी आहार-विहाराची शिस्त आवश्यक- वैद्य राघवेंद्र नादरगी.

Next Post

चार्ज अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जनगणना प्रशिक्षण गांभीर्याने घ्यावे– जिल्हा जनगणना अधिकारी अभिजीत पाटील

Related Posts

ह.भ.प. लक्ष्मण महाराज धोत्रे यांच्या १४४ व्या जयंतीनिमित्त वडियाराज सामाजिक संस्थेतर्फे अभिवादन करून वडियाराज वार्ताफलकाचे उद्घाटन
इतर घडामोडी

ह.भ.प. लक्ष्मण महाराज धोत्रे यांच्या १४४ व्या जयंतीनिमित्त वडियाराज सामाजिक संस्थेतर्फे अभिवादन करून वडियाराज वार्ताफलकाचे उद्घाटन

November 12, 2026
सोलापूरच्या शांभवी अजगुंडेची राष्ट्रीय स्तरावर झेप; जपान दौऱ्याचीही संधी!
इतर घडामोडी

सोलापूरच्या शांभवी अजगुंडेची राष्ट्रीय स्तरावर झेप; जपान दौऱ्याचीही संधी!

November 12, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ऊसतोड कामगारांसोबत साजरी केली दिवाळी
इतर घडामोडी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ऊसतोड कामगारांसोबत साजरी केली दिवाळी

November 9, 2026
पंढरपूर कॉरिडॉर अंतर्गत प्रत्येक सफाई कामगारांना ६०० चौरस फुटांचे घर मंजूर -पालकमंत्री जयकुमार गोरे
इतर घडामोडी

पंढरपूर कॉरिडॉर अंतर्गत प्रत्येक सफाई कामगारांना ६०० चौरस फुटांचे घर मंजूर -पालकमंत्री जयकुमार गोरे

November 9, 2026
ऊसदराच्या प्रश्नावर सोलापूर जिल्ह्यात शेतकरी आक्रमक; १६ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा!
इतर घडामोडी

ऊसदराच्या प्रश्नावर सोलापूर जिल्ह्यात शेतकरी आक्रमक; १६ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा!

November 8, 2026
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
इतर घडामोडी

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

November 8, 2026
Next Post
चार्ज अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जनगणना प्रशिक्षण गांभीर्याने घ्यावे– जिल्हा जनगणना अधिकारी अभिजीत पाटील

चार्ज अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जनगणना प्रशिक्षण गांभीर्याने घ्यावे– जिल्हा जनगणना अधिकारी अभिजीत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हा परिषद सेस योजनेंतर्गत शेती औजारे व यंत्रसामग्रीसाठी ५० टक्के अनुदान

जिल्हा परिषद सेस योजनेंतर्गत शेती औजारे व यंत्रसामग्रीसाठी ५० टक्के अनुदान

November 12, 2026
क्षयरोग निदानाला मिळणार वेग! महाराष्ट्रात बसविणार ३०० अत्याधुनिक यंत्रे

क्षयरोग निदानाला मिळणार वेग! महाराष्ट्रात बसविणार ३०० अत्याधुनिक यंत्रे

November 12, 2026
सोन्याच्या दरात घसरण; सोलापुरात २४ कॅरेट सोने १ लाख ४२ हजार ६८० रुपयांवर!

सोन्याच्या दरात घसरण; सोलापुरात २४ कॅरेट सोने १ लाख ४२ हजार ६८० रुपयांवर!

November 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026