उत्तर सोलापूर तालुक्याची वरदायिनी समजली जाणाऱ्या शिरापूर उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडण्याला पुन्हा प्रारंभ झाला आहे. परतीच्या पावसाने ही शेतकऱ्याच्या आशेवर पाणी फिरल्याने उजनीच्या पाण्याचे महत्व वाढले असून गावोगावी शेती व पिण्याच्या पाण्याची मागणी वाढली आहे.
आता सुरू करण्यात आलेल्या पाण्याने बीबी दारफळ येथील साठवण तलाव अगोदर भरून घेण्यात येणार आहे. तलावात सध्या अत्यल्प पाणीसाठा असून या तलावाच्या पाण्यावर बीबी दारफळ सह रानमसले, अकोलेकटी, सावंतवाडी, नान्नज, आदी गावाचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. त्यामुळे उजनीच्या पाण्याचे बीबी दारफळ तलाव भरून घेण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील गावांसाठी व शेतीसाठी पाणी सोडले जाईल असे जलसंपदा अधिकारी सुभाष देवकते यांनी सांगितले.










