सोलापूर महापालिकेने तब्बल 50 कोटी रुपये खर्चून महापालिका प्रशासकीय इमारतीच्या पाठीमागे कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारले. सोलापूर शहरात विविध चौकात लावलेल्या 331 सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे लाईव्ह फुटेज पाहता येते. तसेच याच ठिकाणी असलेल्या एलईडी वर शहरातील 60 पाण्याच्या टाक्यांमधील पाणी लेव्हल स्काडा सिस्टीमच्या माध्यमातून मॉनिटरिंग करता येते. अत्यंत आधुनिक ही प्रणाली असून याचे ऑपरेशनचे काम अलाईड सोल्युशन या कंपनीला दिले आहे. मात्र या कमांड अँड कंट्रोल सेंटर मधून सोलापूर महापालिकेला फायदा कमी आणि ट्रॅफिकला फायदा जास्त झाला आहे. या कमांड अँड कंट्रोल सेंटरमध्ये बसून ट्रॅफिक पोलीस वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनधारकांवर थेट इ चलन च्या माध्यमातून दंड करत आहे. गेल्या अडीच वर्षाचा विचार करता तब्बल साडे सतरा कोटी रुपये चा दंड सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये बघून ट्राफिक पोलिसांनी केला आहे. एवढे मोठे ट्रॅफिकचे इ चलन कदाचित सोलापूर शहरातच फाडले जात असावे.एप्रिल 2024 ते मार्च 2025 या वर्षात 5 कोटी 82 लाख तर एप्रिल 2025 ते एप्रिल 2026 या वर्षात 9 कोटी 27 लाखांचा दंड करण्यात आला आहे.दरमहा सुमारे 60 ते 65 लाख रुपये दंड सोलापूर शहरातील वाहनधारकांना होतोय तरीही बेशिस्त वाहतुकीला शिस्त येत नाही हे दुर्दैव…










