• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीबाबत कायदेशीर तरतुदी व कार्यपद्धतीचे प्रशिक्षण

Yes News Marathi by Yes News Marathi
September 4, 2026
in मुख्य बातमी
0
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीबाबत कायदेशीर तरतुदी व कार्यपद्धतीचे प्रशिक्षण
0
SHARES
0
VIEWS

SIR अंतर्गत मतदार व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांना सोपविण्यात आलेले काम काटेकोरपणे पार पाडावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन


सोलापूर – विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR) २०२६ अंतर्गत मतदार यादीच्या कामकाजासाठी नियुक्त मतदार नोंदणी अधिकारी (ERO) व सहायक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) यांचे कायदेशीर तरतुदी व कार्यपद्धतीबाबत प्रशिक्षण जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.

या प्रशिक्षणास उपजिल्हा निवडणूक अधिकारी लक्ष्मण कसेकर, उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख, उपजिल्हाधिकारी सुशांत बनसोडे, सदाशिव पडदुने, सुमित शिंदे, विजया पांगारकर, जयश्री आव्हाड, सचिन इथापे यांच्यासह सर्व तहसीलदार उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन म्हणाले की, विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत ERO व AERO यांना सोपविण्यात आलेले काम काटेकोरपणे व पारदर्शक पद्धतीने पूर्ण करावे. कोणत्याही मतदाराला त्रास होणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी. कागदपत्रांची पडताळणी करून त्याबाबतची कारणे लेखी स्वरूपात नोंदवावीत तसेच मतदारांचे आक्षेप समजून घेऊन नियमानुसार कार्यवाही करावी.

जिल्ह्यात नव्याने तयार करण्यात आलेल्या १७ मतदान केंद्रांशी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी परस्पर समन्वय ठेवून कामकाज पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने करावे. या प्रक्रियेत कोणताही पात्र मतदार वगळला जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. कामकाज सुलभ होण्याबरोबरच मतदारांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याकडे विशेष लक्ष द्यावे, असेही त्यांनी सांगितले.

SIR प्रक्रियेत पहिल्या महिन्यात Unmapped अर्थात अद्याप मॅपिंग न झालेल्या मतदारांची तसेच Anomalies अर्थात विसंगतींची प्रक्रिया पूर्ण करावी. दुसऱ्या महिन्यात नमुना अर्ज क्रमांक ६, ७ व ८ संदर्भातील कार्यवाही पूर्ण करावी. BLO मार्फत आवश्यक कागदपत्रे जमा करून घेतल्यानंतर पुढील कार्यवाही करावी. काही अडचणी निर्माण झाल्या तरी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता निष्पक्ष व तटस्थपणे काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी केले.

४ नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादीचे प्रकाशन
उपजिल्हाधिकारी सदाशिव पडदुने यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना सांगितले की, विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR) २०२६ अंतर्गत अंतिम मतदार यादीचे प्रकाशन ४ नोव्हेंबर २०२६ रोजी करण्यात येणार आहे. यावेळी त्यांनी भारतीय संविधानातील अनुच्छेद ३२४ ते ३२९ मधील निवडणूकविषयक तरतुदींची माहिती दिली.

तसेच वैधानिक तरतुदी व संबंधित नमुने, मतदारांचे प्रकार, मतदार यादी व्यवस्थापनाची प्रशासकीय यंत्रणा, मतदार म्हणून नोंदणीसाठी पात्रता व अपात्रता, मतदार यादीचे पुनरीक्षण, मतदार यादीची भाषा व रचना आदी विषयांची माहिती ERO व AERO यांना पॉवरपॉइंट सादरीकरणाद्वारे देण्यात आली.

सुनावणीची दैनंदिन नोंद ठेवण्याच्या सूचना
प्रांत अधिकारी अकलूज तथा मतदार नोंदणी अधिकारी, माळशिरस विजया पांगारकर यांनी सुनावणी प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. मतदाराला नाव, पत्ता किंवा इतर तपशीलांमध्ये दुरुस्ती करावयाची असल्यास त्याच्याकडून आवश्यक पुरावे घ्यावेत. संबंधित कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर मूळ कागदपत्र तपासून त्याची छायांकित प्रत कार्यालयीन अभिलेखासाठी जतन करावी, असे त्यांनी सांगितले.

महसूल मंडळ कार्यालय तसेच ग्रामपंचायत कार्यालयात सुनावणी घेता येईल. प्रत्येक सुनावणीची तारीख, वेळ व ठिकाण पूर्वनियोजित करावे. एका दिवसात १५० सुनावणी घेता येतील. तीन वेळापत्रकांमध्ये प्रत्येकी ५० सुनावणी अशा पद्धतीने सुनावणीचे नियोजन करावे. सुनावणी प्रक्रियेसाठी आवश्यक इंटरनेट सुविधा उपलब्ध करून घेऊन स्वतंत्र टीम तयार करावी. दररोजच्या सुनावणीच्या नोंदी त्याच दिवशी अद्ययावत कराव्यात, असेही श्रीमती पांगारकर यांनी स्पष्ट केले.

मतदाराला नोटीस देताना त्याची पोहोच घ्यावी व त्याची पडताळणी AERO यांनी करावी. सुनावणीच्या वेळी मतदाराच्या आई-वडिलांच्या नावासंदर्भातील आवश्यक पुरावे तपासावेत. प्रत्येक कागदपत्राची खातरजमा करून त्याची छायांकित प्रत अभिलेखात ठेवावी. तसेच मतदाराचा फोटो व नोटीसचा फोटो अपलोड करावा. दैनंदिन कामकाजाचा डेटा डाउनलोड करून सुरक्षितपणे जतन करावा. यासाठी स्वतंत्र टीम नियुक्त करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

मतदाराच्या कागदपत्रांमध्ये शाळा सोडल्याचा दाखला हा महत्त्वाचा पुरावा असल्याचे त्यांनी नमूद केले. सुनावणीच्या वेळी मतदार गैरहजर राहिल्यास दुसरी सुनावणी घेण्यात यावी. त्यानंतरही गैरहजर राहिल्यास तिसरी सुनावणी घ्यावी. तिसऱ्या सुनावणीनंतरही मतदार गैरहजर राहिल्यास निर्णय घेण्याची घाई करू नये. संपूर्ण कामकाजाची ऑब्झर्वरमार्फत तपासणी केली जाते. त्यामुळे BLO, ERO व AERO यांनी प्रत्येक टप्प्यावर काळजीपूर्वक काम करावे, असे श्रीमती पांगारकर यांनी सांगितले.

सुनावणीदरम्यान प्राप्त झालेल्या कागदपत्रांची संख्या व त्यांची नोंद यांची खातरजमा करावी. रोजनामा फाईल तयार करून प्रत्येक पानाला क्रमांक द्यावा. संपूर्ण प्रक्रियेतील प्रत्येक बाबीची बारकाईने पडताळणी करून व्यवस्थित अभिलेख व नोंदी ठेवाव्यात, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. प्रांताधिकारी सदाशिव पडदुने व प्रांत अधिकारी विजया पांगरकर यांनी सर्व मतदार नोंदणी अधिकारी आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांचे सविस्तर प्रशिक्षण घेतले.

Previous Post

सोलापूर शहरात ७ ते २१ सप्टेंबर दरम्यान मनाई आदेश लागू

Next Post

SIR अंतर्गत मतदार व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांना सोपविण्यात आलेले काम काटेकोरपणे पार पाडावे– जिल्हाधिकारी

Related Posts

सोलापूर शहरात ७ ते २१ सप्टेंबर दरम्यान मनाई आदेश लागू
मुख्य बातमी

सोलापूर शहरात ७ ते २१ सप्टेंबर दरम्यान मनाई आदेश लागू

September 4, 2026
गेल्या 17 वर्षात सोलापूर जिल्ह्यात एकही अंगणवाडी मंजूर नाही…!
मुख्य बातमी

गेल्या 17 वर्षात सोलापूर जिल्ह्यात एकही अंगणवाडी मंजूर नाही…!

September 4, 2026
राष्ट्रीय स्तरावरील महिला कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची तीन मुलांसह आत्महत्या ..!
मुख्य बातमी

राष्ट्रीय स्तरावरील महिला कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची तीन मुलांसह आत्महत्या ..!

September 4, 2026
पालकमंत्री म्हणाले, पंढरीत विमानतळ उभारणार..!
मुख्य बातमी

पालकमंत्री म्हणाले, पंढरीत विमानतळ उभारणार..!

September 3, 2026
आरोग्यदायी आहारासाठी ‘रेड वॉर्निंग’ लेबलचा FSSAI चा प्रस्ताव.
मुख्य बातमी

आरोग्यदायी आहारासाठी ‘रेड वॉर्निंग’ लेबलचा FSSAI चा प्रस्ताव.

September 3, 2026
रे नगर येथे लाभार्थी वास्तव्यास येण्यासाठी असलेल्या अडचणी सोडवल्या जाणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
मुख्य बातमी

रे नगर येथे लाभार्थी वास्तव्यास येण्यासाठी असलेल्या अडचणी सोडवल्या जाणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 3, 2026
Next Post
SIR अंतर्गत मतदार व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांना सोपविण्यात आलेले काम काटेकोरपणे पार पाडावे– जिल्हाधिकारी

SIR अंतर्गत मतदार व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांना सोपविण्यात आलेले काम काटेकोरपणे पार पाडावे– जिल्हाधिकारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुल्यवर्धीत शिक्षणातुन राष्ट्राचा विकास- डॉ. सोमेश्वर पाटील

मुल्यवर्धीत शिक्षणातुन राष्ट्राचा विकास- डॉ. सोमेश्वर पाटील

September 4, 2026
आरोग्य सेवा एका क्लिकवर आणण्यासाठी ॲप विकसित करणार; आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार सावंत यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

आरोग्य सेवा एका क्लिकवर आणण्यासाठी ॲप विकसित करणार; आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार सावंत यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

September 4, 2026
SIR अंतर्गत मतदार व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांना सोपविण्यात आलेले काम काटेकोरपणे पार पाडावे– जिल्हाधिकारी

SIR अंतर्गत मतदार व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांना सोपविण्यात आलेले काम काटेकोरपणे पार पाडावे– जिल्हाधिकारी

September 4, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026