• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर शहरात ७ ते २१ सप्टेंबर दरम्यान मनाई आदेश लागू

Yes News Marathi by Yes News Marathi
September 4, 2026
in मुख्य बातमी
0
सोलापूर शहरात ७ ते २१ सप्टेंबर दरम्यान मनाई आदेश लागू
0
SHARES
1
VIEWS

शस्त्रे, स्फोटके, पाचपेक्षा अधिक व्यक्तींच्या जमावास बंदी

सोलापूर – सोलापूर शहरात सार्वजनिक शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी ००.०१ वाजेपासून ते २१ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री २४.०० वाजेपर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा) डॉ. अश्विनी पाटील यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा, १९५१ चे कलम ३७ (१) व (२) अन्वये हा आदेश जारी केला आहे.

काय बाळगण्यास प्रतिबंध?
या कालावधीत शस्त्रे, अग्निशस्त्रे, बॅटन, तलवारी, भाले, दंडुके, सोटे, विना परवाना बंदुका, चाकू, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बाळगण्यास मनाई आहे. परवानाधारक बंदुकीसाठी सक्षम प्राधिकाऱ्याची विशिष्ट परवानगी घेतल्यासच सूट राहील.

तसेच कोणताही स्फोटक पदार्थ, दगड, क्षेपणास्त्रे, ती फेकण्याची उपकरणे बाळगणे, गोळा करणे व तयार करणे, व्यक्ती, प्रेत, आकृती किंवा पुतळ्यांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक ठिकाणी टीकात्मक उद्गार काढणे, गाणी म्हणणे, संगीत वाजवणे यावर बंदी घालण्यात आली आहे.

शालीनता किंवा शिष्टाचाराला बाधा आणणारी चित्रे, चिन्हे, फलक, वस्तू तयार करणे, प्रदर्शित करणे किंवा प्रसारित करणे, ज्यामुळे सामाजिक नैतिकता, सार्वजनिक सुरक्षा धोक्यात येईल किंवा राज्यव्यवस्थेविरुद्ध वातावरण निर्माण होईल, अशा कृतींनाही प्रतिबंध करण्यात आला आहे.

उल्लंघन केल्यास कारवाई
प्रतिबंधित वस्तूंसह आढळल्यास कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यामार्फत संबंधित व्यक्तीस निःशस्त्र केले जाईल. जप्त केलेली शस्त्रे, स्फोटके, क्षेपणास्त्रे राज्य सरकारकडे जमा करण्यात येतील.

कोणाला सूट?
१. सरकारी / निमसरकारी सेवेत असलेल्या व कर्तव्यासाठी शस्त्र बाळगणे आवश्यक असलेल्या व्यक्तींना.
२. खाजगी सुरक्षा रक्षक, गुरखा, चौकीदार यांना ३.५ फूट लांबीपर्यंतची लाठी बाळगण्यास परवानगी राहील.

पाच किंवा अधिक व्यक्तींच्या जमावावर बंदी

महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (३) नुसार याच १५ दिवसांच्या कालावधीत सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पाच किंवा अधिक व्यक्तींच्या कोणत्याही संमेलनास, मिरवणुकीस, तसेच मिरवणुकीत लाऊडस्पीकर, वाद्य, बँड व फटाके वाजवण्यास मनाई आहे.

खालील बाबींना सूट राहील :

  • विवाह समारंभ, अंत्यसंस्कार
  • सहकारी संस्था, कंपन्या, क्लब, संघटनांच्या कायदेशीर बैठका
  • चित्रपटगृहे, नाट्यगृहे, सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी प्रेक्षकांचे संमेलन
  • सरकारी / निमसरकारी कार्यालये, न्यायालये येथील शासकीय कामकाजासाठीचे संमेलन
  • शाळा, महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांमधील शैक्षणिक उपक्रम
  • कारखाने, दुकाने, आस्थापनांमधील सामान्य व्यापार-व्यवसायासाठीचे संमेलन
  • विभागीय पोलीस उप-आयुक्त किंवा पर्यवेक्षक अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेले संमेलन / मिरवणुका
Previous Post

सोलापूर शहर मध्य मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध..

Next Post

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीबाबत कायदेशीर तरतुदी व कार्यपद्धतीचे प्रशिक्षण

Related Posts

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीबाबत कायदेशीर तरतुदी व कार्यपद्धतीचे प्रशिक्षण
मुख्य बातमी

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीबाबत कायदेशीर तरतुदी व कार्यपद्धतीचे प्रशिक्षण

September 4, 2026
गेल्या 17 वर्षात सोलापूर जिल्ह्यात एकही अंगणवाडी मंजूर नाही…!
मुख्य बातमी

गेल्या 17 वर्षात सोलापूर जिल्ह्यात एकही अंगणवाडी मंजूर नाही…!

September 4, 2026
राष्ट्रीय स्तरावरील महिला कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची तीन मुलांसह आत्महत्या ..!
मुख्य बातमी

राष्ट्रीय स्तरावरील महिला कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची तीन मुलांसह आत्महत्या ..!

September 4, 2026
पालकमंत्री म्हणाले, पंढरीत विमानतळ उभारणार..!
मुख्य बातमी

पालकमंत्री म्हणाले, पंढरीत विमानतळ उभारणार..!

September 3, 2026
आरोग्यदायी आहारासाठी ‘रेड वॉर्निंग’ लेबलचा FSSAI चा प्रस्ताव.
मुख्य बातमी

आरोग्यदायी आहारासाठी ‘रेड वॉर्निंग’ लेबलचा FSSAI चा प्रस्ताव.

September 3, 2026
रे नगर येथे लाभार्थी वास्तव्यास येण्यासाठी असलेल्या अडचणी सोडवल्या जाणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
मुख्य बातमी

रे नगर येथे लाभार्थी वास्तव्यास येण्यासाठी असलेल्या अडचणी सोडवल्या जाणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 3, 2026
Next Post
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीबाबत कायदेशीर तरतुदी व कार्यपद्धतीचे प्रशिक्षण

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीबाबत कायदेशीर तरतुदी व कार्यपद्धतीचे प्रशिक्षण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुल्यवर्धीत शिक्षणातुन राष्ट्राचा विकास- डॉ. सोमेश्वर पाटील

मुल्यवर्धीत शिक्षणातुन राष्ट्राचा विकास- डॉ. सोमेश्वर पाटील

September 4, 2026
आरोग्य सेवा एका क्लिकवर आणण्यासाठी ॲप विकसित करणार; आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार सावंत यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

आरोग्य सेवा एका क्लिकवर आणण्यासाठी ॲप विकसित करणार; आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार सावंत यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

September 4, 2026
SIR अंतर्गत मतदार व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांना सोपविण्यात आलेले काम काटेकोरपणे पार पाडावे– जिल्हाधिकारी

SIR अंतर्गत मतदार व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांना सोपविण्यात आलेले काम काटेकोरपणे पार पाडावे– जिल्हाधिकारी

September 4, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026