सोलापूर जिल्ह्यात मतदार पुनर्नरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. जिल्ह्यात 39 लाख 18 हजार 424 एवढी मतदार होते. यामध्ये एक लाख 70 हजार 696 मयत मतदार तसेच एक लाख 41 हजार एवढे दुबार नोंदणी असलेले मतदार असल्यामुळे यातील दोन लाख 76 हजार 637 मतदारांची नावे थेट वगळण्यात आली आहेत. आता जागेवर न आढळलेले तसेच स्थलांतरित झालेले तीन लाख 46 हजार मतदार असून त्यांना मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी संधी दिली जाणार आहे. एस आय आर चे काम पूर्ण झाले नसून अजूनही सुरूच आहे त्यामुळे ज्यांचे नाव मतदार यादीत नाही त्यांनी ते समाविष्ट करून घ्यावे असे आवाहन सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयेन यांनी केले आहे.







