• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

‘36,211 कंपन्या बंद’ शरद पवारांच्या टीकेला फडणवीसांचे स्पष्टीकरण , महाराष्ट्र क्रमांक 1 वरच!

Yes News Marathi by Yes News Marathi
August 14, 2026
in इतर घडामोडी
0
‘36,211 कंपन्या बंद’ शरद पवारांच्या टीकेला फडणवीसांचे स्पष्टीकरण , महाराष्ट्र क्रमांक 1 वरच!
0
SHARES
3
VIEWS

देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, शरद पवार साहेब, संसदेतील खा. राजाभाऊ वाजे यांच्या एका प्रश्नाच्या उत्तरात काही माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली. राज्यातील 36,211 कंपन्या बंद झाल्या वगैरे… काही नवख्या नेत्यांनी त्यासंदर्भात सोयीचा अर्थ काढून समाजमाध्यमांवर पोस्ट केल्या आणि काही माध्यमांनी त्याच्या बातम्या केल्या. पण, आपण कायम महाराष्ट्रहिताचा विचार करणारे सुजाण आणि ज्येष्ठ नेते आहात, त्यामुळे आपल्या मनात कोणता गैरसमज राहू नये, म्हणून हा थोडा विस्ताराने लेखनप्रपंच!

मुळात एक लक्षात घेतले पाहिजे, ज्या कंपन्या बंद होतात, त्यातील 76 टक्के या डिफंक्ट कंपनी असतात. डिफंक्ट म्हणजे डिसफंक्शनल, म्हणजे ज्या कधी सुरुच झाल्या नाहीत! आता ‘संसदेत विचारला प्रश्न आणि त्याचे उत्तर’ किंवा ‘माहिती अधिकारात विचारलेला प्रश्न आणि त्याचे उत्तर’ याचे एक प्रारुप ठरलेले असते. त्या प्रश्नावर सभागृहात चर्चा झाली, तरच इतर तपशील मिळू शकतो. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वात सुदैवाने संपूर्ण माहिती ही पारदर्शीपणे संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आपण कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या संकेतस्थळावर गेलात तर तेथे आपल्याला संपूर्ण माहिती प्राप्त होऊ शकते. ही माहिती देशातील प्रत्येक नागरिक, प्रत्येक माध्यमे पाहू शकतात. (या संकेतस्थळाची लिंक अशी : mcacdm.nic.in/data-trends ) आणि मला सांगताना हेही आनंद होतो की, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र क्रमांक 1 वर होता आणि कायम क्रमांक 1 वरच राहील.

देशात एकूण 31 लाखांहून अधिक कंपन्या रजिस्टर्ड आहेत. त्यापैकी सुमारे 21 लाख कंपन्या या आज सक्रिय आहेत.

  • 2015-16 मध्ये भारतात सक्रिय कंपन्यांची संख्या 6,78,768 इतकी होती, ती आता 21,17,747 इतकी आहे. म्हणजेच गेल्या 10 वर्षांत मोदीजींच्या नेतृत्त्वात सक्रिय कंपन्यांच्या संख्येत तिपट्टीहून अधिक वाढ झाली आहे.
  • आता सर्वाधिक कंपन्या असलेल्या देशातील आघाडीच्या राज्यांची यादी…3 जून 2026 ची स्थिती
    सर्वाधिक कंपन्या महाराष्ट्रात 3,96,211
    त्याखालोखाल दिल्ली : 2,72,342
    तिसर्‍या क्रमांकावर उत्तर प्रदेश : 1,85,982
  • बंद झालेल्या कंपन्या.. 3 जून 2026 ची स्थिती
    कोविड काळ वगळता सरासरी 20 ते 22 हजार कंपन्या दरवर्षी बंद होतात.
    त्याच्या कारणांची वर्गवारी अशी : 76 टक्के डिफंक्ट कंपनी (डिफंक्ट म्हणजे डिसफंक्शनल, म्हणजे ज्या कधी सुरुच झाल्या नाही), 12 टक्के कंपन्यांचे अमालगमेशन (एकत्रिकरण) आणि 2 टक्के कंपन्या विसर्जित
    2019-20 या एकाच वर्षी कार्पोरेट व्यवहार मंत्रालयाने एक विशेष मोहीम राबवून 6 लाख कंपन्या रद्द केल्या. प्रत्येक वर्षीच्या रकान्यात गेले तर निष्क्रीय कंपन्या ‘स्टाईक ऑफ’ केल्याचीच संख्या अधिक आहे. त्यामुळे बंद झालेल्या कंपन्या कमी आणि ‘स्ट्राईक ऑफ’ झालेल्या कंपन्यांचीच संख्या अधिक आहे.
  • नवीन कंपनींची नोंदणी (टॉप टेन राज्य)
    दरवर्षी सुमारे 1 लाख नवीन कंपनींची देशात नोंदणी होत असते. त्यात दरवर्षी महाराष्ट्र सर्वांत पुढे असतो. उदाहरणासाठी 2025-26 या वर्षांची आकडेवारी घेऊ. महाराष्ट्र : 41,525 कंपन्या, दिल्ली : 20,272 कंपन्या, उत्तरप्रदेश : 27,494 कंपन्या, कर्नाटक : 17,857 कंपन्या, तामिळनाडू : 17,024 कंपन्या, तेलगंणा : 17,300 कंपन्या, गुजरात : 14,666 कंपन्या आणि पश्चिम बंगाल : 10,598 कंपन्या.
  • राहिला प्रश्न चाकणचा. तर तेथे काही समस्या निश्चितपणे आहेत. मंत्री उदय सामंत यांना तेथे लक्ष घालण्यास निर्देशित करण्यात आले आहे. एमआयडीसीच्या पुढाकाराने 12 ऑगस्ट रोजी जिल्हा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, पीएमआरडीए, राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण, जिल्हा परिषद अशा सर्व संबंधित यंत्रणांची एक बैठक घेण्यात आली आहे. सर्व समस्या ऐकून घेत, त्यावर समाधान काढण्यासाठी एक अल्पकालीन आणि एक दीर्घकालिन असा आराखडा निश्चित करण्यात आला आहे. एकही उद्योग तेथूनही बाहेर जाणार नाही, असाच आमचा प्रयत्न असेल. महाराष्ट्र उद्योगस्नेही आहेच. म्हणून सातत्याने परकीय गुंतवणूक ही राज्यात अधिक येते. सातत्याने क्रमांक 1 वर आपण आहोत आणि राहू.
Previous Post

ड्रोन उद्योगाच्या भरारीसाठी महाराष्ट्र सज्ज, टास्क फोर्सची घोषणा!

Next Post

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार चाकण MIDC प्रश्नाबाबत घेणार बैठक..

Related Posts

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम
इतर घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम

October 3, 2026
पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताचा सुवर्णविजय !
इतर घडामोडी

पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताचा सुवर्णविजय !

October 3, 2026
पुण्यात होणार मराठी अध्ययन उत्कृष्टता केंद्र !
इतर घडामोडी

पुण्यात होणार मराठी अध्ययन उत्कृष्टता केंद्र !

October 3, 2026
निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली
इतर घडामोडी

निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली

October 2, 2026
AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम
इतर घडामोडी

AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम

October 2, 2026
निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक
इतर घडामोडी

निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक

October 2, 2026
Next Post
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार चाकण MIDC प्रश्नाबाबत घेणार बैठक..

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार चाकण MIDC प्रश्नाबाबत घेणार बैठक..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करा; सुभाष देशमुखांची मागणी

भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करा; सुभाष देशमुखांची मागणी

October 3, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम

October 3, 2026
पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताचा सुवर्णविजय !

पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारताचा सुवर्णविजय !

October 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026