• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राष्ट्रीय खाद्यतेल अभियान–तेलबिया अंतर्गत काढणीपश्चात पायाभूत सुविधा व फ्लेक्झी घटकांसाठी अर्जांचे आवाहन

Yes News Marathi by Yes News Marathi
August 11, 2026
in Blog
0
राष्ट्रीय खाद्यतेल अभियान–तेलबिया अंतर्गत काढणीपश्चात पायाभूत सुविधा व फ्लेक्झी घटकांसाठी अर्जांचे आवाहन
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर- राष्ट्रीय खाद्यतेल अभियान–तेलबिया (NMEO-OS) अंतर्गत सन 2026-27 साठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने नवीन कार्यकारी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. या अभियानांतर्गत तेलबिया उत्पादन वाढविण्यासोबतच काढणीपश्चात होणारे नुकसान कमी करून शेतमालाला मूल्यवर्धन व स्थानिक स्तरावर बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी विविध घटकांमध्ये आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक पात्र लाभार्थ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुकाचार्य भोसले यांनी केले आहे.

काढणीपश्चात पायाभूत सुविधा
तेलबियांची काढणी, संकलन व प्रक्रिया अधिक प्रभावी करण्यासाठी या घटकांतर्गत आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. तेलबियांची योग्य प्रकारे प्रक्रिया करून तेल काढण्याची क्षमता वाढविणे आणि स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा या घटकाचा उद्देश आहे.

या घटकासाठी वैयक्तिक शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPOs), सहकारी संस्था, मूल्य साखळी भागीदार (VCPs) तसेच नवीन नोंदणीकृत तेल प्रक्रिया उद्योग पात्र आहेत. 10 टन प्रतिदिन क्षमतेच्या तेल काढणी युनिटसाठी यंत्रसामग्री व उपकरणांच्या प्रकल्प खर्चाच्या 33 टक्के किंवा कमाल 9 लाख 90 हजार रुपये, यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढे अनुदान देण्यात येणार आहे.

इच्छुक लाभार्थ्यांनी तालुका किंवा जिल्हास्तरावर ऑफलाईन अर्ज सादर करावेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2026 आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी एक युनिटचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. उद्दिष्टाच्या अधीन राहून जिल्हा तेलबिया अभियान समिती (DOSM) किंवा जिल्हा कार्यकारी समिती (DEC) मार्फत अर्जांची छाननी करण्यात येईल. त्यानंतर तांत्रिक मूल्यांकन करून पात्र अर्जांना मंजुरी देण्यात येईल.

फ्लेक्झी घटक
फ्लेक्झी घटकांतर्गत मिनी ऑइल मिल/एक्सपेलर युनिटसाठी फिल्टर प्रेससह प्रति युनिट कमाल 4 लाख रुपये, तर फिल्टर प्रेसशिवाय प्रति युनिट कमाल 3 लाख रुपये अनुदान देण्यात येणार आहे. या अनुदानाची मर्यादा अनुसूचित जाती/जमाती, अल्पभूधारक व महिला लाभार्थ्यांसाठी 50 टक्के, तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी 40 टक्के आहे.

फ्लेक्झी घटकासाठी अर्ज महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने करावयाचे आहेत. इच्छुक पात्र लाभार्थ्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

Previous Post

रिक्षा, टॅक्सी, कॅब चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळा’चे सदस्यत्व-उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील

Next Post

लोकसेवा हक्क अंतर्गत १४८ नागरी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या कार्याचे राज्य आयुक्तांकडून कौतुक

Related Posts

शिरीष कणेकरांच्या ‘कणेकरी शैली’चा रंगला आविष्कार
Blog

शिरीष कणेकरांच्या ‘कणेकरी शैली’चा रंगला आविष्कार

October 3, 2026
भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करा; सुभाष देशमुखांची मागणी
Blog

भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करा; सुभाष देशमुखांची मागणी

October 3, 2026
दुष्काळाच्या सावटाखाली पदवीधर-शिक्षक निवडणुकीची राजकीय रणधुमाळी
Blog

दुष्काळाच्या सावटाखाली पदवीधर-शिक्षक निवडणुकीची राजकीय रणधुमाळी

October 2, 2026
जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून मंगळवेढा-सांगोला तालुक्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी
Blog

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून मंगळवेढा-सांगोला तालुक्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी

October 2, 2026
दुष्काळाची दाहकता : सोलापूर जिल्ह्यात पाणीपुरवठ्याचे 82 टँकर,सर्वाधिक टँकर कुठे?
Blog

दुष्काळाची दाहकता : सोलापूर जिल्ह्यात पाणीपुरवठ्याचे 82 टँकर,सर्वाधिक टँकर कुठे?

September 29, 2026
सोलापुरात ‘ज्ञानभक्ती स्त्रीशक्ती’ सोहळ्यात संतपरंपरेचा जागर
Blog

सोलापुरात ‘ज्ञानभक्ती स्त्रीशक्ती’ सोहळ्यात संतपरंपरेचा जागर

September 29, 2026
Next Post
लोकसेवा हक्क अंतर्गत १४८ नागरी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या कार्याचे राज्य आयुक्तांकडून कौतुक

लोकसेवा हक्क अंतर्गत १४८ नागरी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या कार्याचे राज्य आयुक्तांकडून कौतुक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरीष कणेकरांच्या ‘कणेकरी शैली’चा रंगला आविष्कार

शिरीष कणेकरांच्या ‘कणेकरी शैली’चा रंगला आविष्कार

October 3, 2026
भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करा; सुभाष देशमुखांची मागणी

भंडारकवठे सोसायटीचा ठराव रद्द करा; सुभाष देशमुखांची मागणी

October 3, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मंगळवारी ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ विशेष उपक्रम

October 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026