• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूरची कन्या श्रावणी सूर्यवंशीची भारतीय संघात निवड; बँकॉक येथे भारताचे करणार प्रतिनिधित्व

Yes News Marathi by Yes News Marathi
July 15, 2026
in Blog
0
सोलापूरची कन्या श्रावणी सूर्यवंशीची भारतीय संघात निवड; बँकॉक येथे भारताचे करणार प्रतिनिधित्व
0
SHARES
44
VIEWS

सोलापूरच्या डायव्हिंगपटू श्रावणी सूर्यवंशी हिची १२ वी एशियन एज ग्रुप डायव्हिंग चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. ही प्रतिष्ठेची स्पर्धा १६ ते २५ जुलै २०२६ या कालावधीत बँकॉक (थायलंड) येथे आयोजित करण्यात आली असून, श्रावणी भारतीय संघासोबत स्पर्धेसाठी रवाना झाली आहे.

श्रावणीची भारतीय संघात निवड तिच्या सातत्यपूर्ण आणि दमदार कामगिरीच्या जोरावर झाली आहे. १७ ते १९ जून २०२६ दरम्यान अहमदाबाद येथील वीर सावरकर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे झालेल्या निवड चाचणी स्पर्धेत तिने १ मीटर स्प्रिंगबोर्ड, ३ मीटर स्प्रिंगबोर्ड आणि हायबोर्ड या तिन्ही प्रकारांत प्रथम क्रमांक पटकावत आपले वर्चस्व सिद्ध केले. या उल्लेखनीय कामगिरीमुळे तिची भारतीय संघात निवड निश्चित झाली.

अवघ्या १७ व्या वर्षी श्रावणीने डायव्हिंग या साहसी क्रीडा प्रकारात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शालेय तसेच फेडरेशनच्या विविध स्पर्धांमध्ये तिने आतापर्यंत एकूण ७४ पदकांची कमाई केली आहे.

तिची आतापर्यंतची पदकांची कामगिरी :

राज्यस्तर: ३० सुवर्ण, ६ रौप्य, १ कांस्य
राष्ट्रीय स्तर: २१ सुवर्ण, ६ रौप्य, २ कांस्य
आंतरराष्ट्रीय स्तर: २ सुवर्ण, ४ रौप्य, २ कांस्य

एकूण: ५३ सुवर्ण, १६ रौप्य आणि ६ कांस्य अशी ७४ पदकांची अभिमानास्पद कमाई श्रावणीने केली आहे.

श्रावणीच्या या यशामागे तिचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक श्रीकांत शेटे यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि कठोर मेहनत लाभली आहे. त्यांच्या प्रशिक्षणामुळेच श्रावणीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत भारतीय संघात स्थान मिळवले आहे.

आता बँकॉक येथे होणाऱ्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत श्रावणी भारताचे प्रतिनिधित्व करणार असून, तिच्याकडून सुवर्णपदकाची अपेक्षा संपूर्ण देशाला आहे. सोलापूरसह महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची बाब असून, श्रावणीने भारताचा तिरंगा उंचावत सुवर्णपदक जिंकावे, अशा शुभेच्छांचा वर्षाव सर्व स्तरातून होत आहे.

Previous Post

सोलापुरात ‘रंगधारा’ चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन

Next Post

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पाठपुराव्याला यश : सोलापूर-मुंबई विमानसेवा २ ऑगस्टपासून पुन्हा सुरू

Related Posts

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड
Blog

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी
Blog

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

October 13, 2026
कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!
Blog

कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!

October 13, 2026
दिवाळीसाठी रेल्वेच्या 256 विशेष गाड्या !
Blog

दिवाळीसाठी रेल्वेच्या 256 विशेष गाड्या !

October 13, 2026
श्रीनिअंबा नृत्यालय सोलापूर आयोजित श्रीनिअंबा नवरात्री नवदुर्गा नृत्य संकीर्तन २०२६
Blog

श्रीनिअंबा नृत्यालय सोलापूर आयोजित श्रीनिअंबा नवरात्री नवदुर्गा नृत्य संकीर्तन २०२६

October 13, 2026
खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेच्या शिक्षेतून मायलेकींची उच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता
Blog

खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेच्या शिक्षेतून मायलेकींची उच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता

October 12, 2026
Next Post
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पाठपुराव्याला यश : सोलापूर-मुंबई विमानसेवा २ ऑगस्टपासून पुन्हा सुरू

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पाठपुराव्याला यश : सोलापूर-मुंबई विमानसेवा २ ऑगस्टपासून पुन्हा सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026