• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राज्यातील सर्वात मोठ्या ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रे’चे २७ जून रोजी सोलापुरात भव्य आगमन!

Yes News Marathi by Yes News Marathi
June 25, 2026
in Blog
0
राज्यातील सर्वात मोठ्या ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रे’चे २७ जून रोजी सोलापुरात भव्य आगमन!
0
SHARES
2
VIEWS

निर्मलकुमार फडकुले सभागृहात गोसंवाद, गो-उत्पादन प्रदर्शन, मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रम

सोलापूर, दि. २४ जून :

महाराष्ट्रातील देशी गोवंशाचे संरक्षण, संवर्धन आणि गोशाळांना आत्मनिर्भर बनविण्याच्या उ‌द्देशाने महाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘राज्यमाता गौमाता संवाद यात्रा’ या राज्यव्यापी जनजागृती अभियानाचे शनिवार, दि. २७ जून २०२६ रोजी दुपारी ४.३० वाजता चार पुतळा येथून भव्य दिंडीला प्रारंभ होईल. ही दिंडी शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे पोहोचेल.

“ह.भ.प.गहिनीनाथ औसेकर महाराज यांच्या अध्यक्षतेखाली तसेच महाराष्ट्र राज्याचे पालकमंत्री जयकु‌मार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख व राजेंद्र राऊत, विधान परिषद सदस्य (आमदार) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भव्य कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न होणार आहे.”

त्यानंतर तेथे ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रा’ अंतर्गत गोसंवाद, गो-उत्पादन प्रदर्शन, मार्गदर्शन, सत्कार समारंभ व अन्य नियोजित कार्यक्रम उत्साहात संपन्न होतील.”

या निमित्ताने निर्मलकुमार फडकुले सभागृह, श्री सिद्धेश्वर मंदिर परिसर, सोलापूर येथे गोमाता संवाद, गो-उत्पादन प्रदर्शन, नैसर्गिक शेती मार्गदर्शन, शासनाच्या योजनांची माहिती, गोशाळा विकास विषयक परिसंवाद तसेच गोवंश संवर्धन जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष तथा यात्रा आयोजन समितीचे प्रमुख शेखरजी मुंदडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २२ जून ते ५ जुलै २०२६ या कालावधीत ही ऐतिहासिक यात्रा राज्यातील ३५ जिल्ह्यांमध्ये सुमारे ६,००० किलोमीटरचा प्रवास करणार असून १,००० हून अधिक गोशाळा आणि १५,००० पेक्षा अधिक गोशाळा संचालक, गोरक्षक, गोपालक, पशुपालक व शेतकरी या उपक्रमात सहभागी होत आहेत.

ही संवाद यात्रा केवळ एक कार्यक्रम नसून गोसंवर्धन, नैसर्गिक शेती, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि गोशाळांच्या आत्मनिर्भरतेसाठी उभारलेले राज्यव्यापी जनआंदोलन आहे. यात्रेदरम्यान गोशाळा संचालक, गोरक्षक, शेतकरी, पशुपालक आणि विविध सामाजिक संस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या जाणार असून शासनाच्या योजनांची माहिती देण्यात येणार आहे.

यात्रेची प्रमुख उ‌द्दिष्टे

देशी गायीच्या शेणावर आधारित नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन.

गोशाला महांघ महाराष्ट्र

गोबर व गोमूत्रापासून तयार होणाऱ्या मूल्यवर्धित उत्पादनांचा प्रसार,

गोशाळांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर करण्यासाठी मार्गदर्शन.

पशुसंवर्धन विभाग व महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या विविध योजनाची माहिती.

गोशाळा व शासन याच्यात प्रभावी समन्वय निर्माण करणे.

गोवंश संरक्षण व संपूर्ण गोवश हत्याबंदी कायद्‌याबाबत जनजागृती.

पोलीस प्रशासन, गोरक्षक व स्थानिक प्रशासन यांच्यात समन्वय वाढविणे.

देशी गोवंशाच्या वैज्ञानिक व पारंपरिक संगोपन पद्धतींचा पसार,

या राज्यव्यापी यात्रेचा शुभारंभ दि. २२ जून २०२६ रोजी पुणे येथील पशुसंवर्धन आयुक्तालयात झाला.

या यात्रेचा भव्य समारोप दि. ५ जुलै २०२६ रोजी नागपूर येथे होणार असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे, राज्य मंत्रिमंडळानील मान्यवर, देशभरातील गौसेवक, गोशाळा संचालक व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

सोलापूरकरांना सहभागाचे आवाहन

सोलापूर जिल्ह्यातील सर्व गोशाळा संचालक, गोरक्षक, गोपालक, शेतकरी, पशुपालक, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना, युवक तसेच गोभक्त नागरिकांनी या ऐतिहासिक कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहन गोसंवर्धनाच्या राज्यव्यापी जनआंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

संपर्क – सोलापूर जिल्हा समन्वय समिती

अनिल तांबे – जिल्हा उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग – ९५११६६५०७७

धनाजी गिड्डे – पशुसंवर्धन नोडल अधिकारी – ९३०९१३१६४७

महेश भंडारी – संवाद यात्रा कार्यक्रम संयोजक – ९४२२४५८०८७

ओमप्रकाश लड्ढा गोशाळा खा – ९८२२७९०९४४

डॉ.देवकर – महा एनजीओ प्रतिनिधी ९६२३५३८९९९

अमोल उंबरजे महा एनजीओ प्रतिनिधी – ८९५६४९०९९९

उल्हास बोराळकर गोशाळा महासंघ प्रतिनिधी- ९६०४८४१४०४

जिल्हा प्रशासन, पशुसंवर्धन विभाग, गोशाळा प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था व गोसेवक यांच्या संयुक्त समन्वयातून या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असून सोलापूरकरांनी या ऐतिहासिक उपक्रमास उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन सोलापूर जिल्हा समन्वय समितीतर्फे करण्यात आले

Previous Post

तांदुळवाडी दुर्घटना : मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाखांची आर्थिक मदत वितरित

Next Post

सोलापुरात इस्माईल कुरेशी यांच्या ‘अजगर अली पंजा’ची सर्वत्र चर्चा; मोहरम मिरवणुकीचे ठरले मुख्य आकर्षण

Related Posts

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत
Blog

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
सोलापुरात माहेश्वरी प्रगती मंडळ युवती शाखेतर्फे ‘तीज री रीत’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपत अखंड टीमवर्कचे दर्शन!
Blog

सोलापुरात माहेश्वरी प्रगती मंडळ युवती शाखेतर्फे ‘तीज री रीत’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपत अखंड टीमवर्कचे दर्शन!

August 23, 2026
ऑफिसर्स क्लब भाडेकरार संशयाच्या भोवऱ्यात ! उपजिल्हाधिकाऱ्यांची मनमानी
Blog

ऑफिसर्स क्लब भाडेकरार संशयाच्या भोवऱ्यात ! उपजिल्हाधिकाऱ्यांची मनमानी

August 22, 2026
पुणे-सोलापूर महामार्गावर स्विफ्टचा अपघात; दोघे गंभीर
Blog

पुणे-सोलापूर महामार्गावर स्विफ्टचा अपघात; दोघे गंभीर

August 21, 2026
मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत
Blog

मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

August 20, 2026
भाजपची सोलापुरात पश्चिम महाराष्ट्र विभागीय संघटनात्मक बैठक सुरु
Blog

भाजपची सोलापुरात पश्चिम महाराष्ट्र विभागीय संघटनात्मक बैठक सुरु

August 20, 2026
Next Post
सोलापुरात इस्माईल कुरेशी यांच्या ‘अजगर अली पंजा’ची सर्वत्र चर्चा; मोहरम मिरवणुकीचे ठरले मुख्य आकर्षण

सोलापुरात इस्माईल कुरेशी यांच्या ‘अजगर अली पंजा’ची सर्वत्र चर्चा; मोहरम मिरवणुकीचे ठरले मुख्य आकर्षण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026