• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

खताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाई ; ११३ परवान्यांवर कारवाई, ७ गुन्हे दाखल

Yes News Marathi by Yes News Marathi
June 20, 2026
in Blog
0
खताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाई ; ११३ परवान्यांवर कारवाई, ७ गुन्हे दाखल
0
SHARES
9
VIEWS

सोलापूर – शेतकऱ्यांना दर्जेदार आणि रास्त दरात खतांचा पुरवठा व्हावा यासाठी कृषी विभागामार्फत पुणे विभागातील पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये खत विक्री केंद्रांची कडक तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. एप्रिल २०२६ पर्यंत विभागात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली असून आतापर्यंत १०७ खत विक्री परवाने निलंबित आणि ६ खत विक्री परवाने रद्द करण्यात आले आहेत, तर ७ केंद्रांवर गुन्हे (एफआयआर) दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती विभागीय कृषी सहसंचालक बाबासाहेब जेजुरकर यांनी दिली आहे.

या मोहिमेअंतर्गत पुणे विभागात एकूण २ हजार ५७६ परवानाधारक केंद्रांची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान २८१ प्रकरणांमध्ये काळाबाजार झाल्याचे समोर आले असून, २७७ केंद्रांना ‘कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील ६५० केंद्रांची तपासणी करण्यात आली. यापैकी ७१ प्रकरणांत अनियमितता आढळली असून २७ परवाने निलंबित करण्यात आले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात ८१२ केंद्रांची तपासणीनंतर १६ खत विक्री परवाने निलंबित आणि २ खत विक्री परवाने रद्द करण्यात आले असून ३ केंद्रांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक १ हजार १२९ केंद्रांची तपासणी करण्यात आली. १८ प्रकरणांमध्ये खतांचे नमुने निकृष्ट आढळले आहेत. जिल्ह्यात एकूण ६४ परवाने निलंबित आणि ४ खत विक्री परवाने रद्द करण्यात आले असून ४ केंद्रांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याशिवाय, अनुदानित युरियाचा औद्योगिक कारणांसाठी वापर टाळण्यासाठी विभागात ४२ औद्योगिक युनिट्सना भेटी देण्यात आल्या आहेत. कृषि विभागातर्फे खतांचा काळाबाजार, कृत्रिम टंचाई, साठेबाजी आणि चढ्या दराने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर यापुढेही कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जेजुरकर यांनी दिला आहे. अधिकृत परवानाधारक कृषि केंद्रातूनच खत खरेदी करावे आणि काही तक्रार आल्यास नजीकच्या कृषि विभागाच्या कार्यालयास संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

कारवाईच्या वेळी पुणे अधिक्षक कृषि अधिकारी विजयकुमार राऊत, तंत्र अधिकारी निलेश गढरी, विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अतुल जाधव आदी उपस्थित होते.

Previous Post

सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक

Related Posts

बालाजी अमाईन्स आणि बालाजी स्पेशालिटी केमिकल्स कडून सीएसआर अंतर्गत सोलापूर व धाराशिव जिल्हयातील २८ शाळांना शालेय साहित्य वितरण
Blog

बालाजी अमाईन्स आणि बालाजी स्पेशालिटी केमिकल्स कडून सीएसआर अंतर्गत सोलापूर व धाराशिव जिल्हयातील २८ शाळांना शालेय साहित्य वितरण

June 19, 2026
शिक्षण विभागातील लाचखोर अधिक्षकासह तिघास रंगेहाथ अटक
Blog

शिक्षण विभागातील लाचखोर अधिक्षकासह तिघास रंगेहाथ अटक

June 19, 2026
शासनाचे बाजार समिती यूजर चार्जेस समितीच्या सदस्य पदावर दिलीप माने यांची निवड
Blog

शासनाचे बाजार समिती यूजर चार्जेस समितीच्या सदस्य पदावर दिलीप माने यांची निवड

June 18, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे- आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील
Blog

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे- आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील

June 18, 2026
क्रीडा स्पर्धेचे विजेतेपद पुणे तर सांस्कृतिकचे विजेतेपद नाशिकला!
Blog

क्रीडा स्पर्धेचे विजेतेपद पुणे तर सांस्कृतिकचे विजेतेपद नाशिकला!

June 17, 2026
उद्या 308 महिला आणि 307 पुरुष ठरवणार सोलापूरचा नवा आमदार…!
Blog

उद्या 308 महिला आणि 307 पुरुष ठरवणार सोलापूरचा नवा आमदार…!

June 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाई ; ११३ परवान्यांवर कारवाई, ७ गुन्हे दाखल

खताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाई ; ११३ परवान्यांवर कारवाई, ७ गुन्हे दाखल

June 20, 2026
सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक

सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक

June 19, 2026
आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच

आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच

June 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026