राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये कोको मिलन व चुटकी यांच्या उपस्थितीत व ढोल ताशाच्या गजरात विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस प्रवेश उत्सव उत्साहात साजरा
सोलापूर : जुनी मिल कंपाऊंड मुरराजी पेठ येथील राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये शाळेचा पहिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुरा यांच्या हस्ते शिक्षण महर्षी स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे ,स्वर्गीय कौशल्या काकू कोठे ,स्वर्गीय राजेश अण्णा कोठे, स्वर्गीय महेश कोठे, विद्येची देवता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून सदर प्रवेश उत्सवाची सुरुवात करण्यात आली.तसेच कोको मिलन व चुटकी यांच्या उपस्थितीत तसेच गुलाबपुष्प चे वर्षाव व ढोल ताशाच्य गजरात विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले.




यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुरा यांनी विद्यार्थ्यांना मागदर्शन पर मनोगत व्यक्त केले. व शाळेतील विद्यार्थ्यांना चॉकलेटचे वाटप करण्यात आले. सदर प्रवेश उत्सवाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गामध्ये विद्यार्थ्यांनी विवध कला गुण सादर करत पहिला दिवस साजरा केला.
सदर प्रवेशोत्सव साजरा करण्यासाठी संस्था अध्यक्ष माननीय सूर्यप्रकाश कोठे, उपाध्यक्ष माननीय आमदार देवेंद्र कोठे, सचिव माननीय प्रथमेश कोठे, माननीय डॉ. राधिका चिलका, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुरा यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले.
सदर प्रवेशोत्सव साजरा करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षककेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.










