• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर विद्यापीठात महिला महोत्सवाचा जल्लोष!

Yes News Marathi by Yes News Marathi
June 15, 2026
in Blog
0
सोलापूर विद्यापीठात महिला महोत्सवाचा जल्लोष!
0
SHARES
2
VIEWS

राज्यातील पाच विद्यापीठांच्या महिला कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

रॅली, गायन, नृत्य आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी पहिला दिवस रंगला

सोलापूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतरविद्यापीठ महिला कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा च्या पहिल्याच दिवशी उत्साह, ऊर्जा आणि सांस्कृतिक वैभवाचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. राज्यातील पाच विद्यापीठांतील महिला कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवत रॅली, वैयक्तिक गायन, वैयक्तिक नृत्य, समूह गायन आणि समूह नृत्य स्पर्धांमधून आपल्या कलागुणांचे प्रभावी दर्शन घडविले.

१५ ते १७ जून २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाचे उद्घाटन कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ समाजसेविका चंद्रिका चौहान यांच्या हस्ते झाले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, वित्त व लेखाधिकारी सीए महादेव खराडे, परीक्षा संचालक डॉ. श्रीकांत अंधारे, डॉ. गणेश काकंडीकर, प्रिसिजनचे फलटणकर, डॉ. केदारनाथ काळवणे, डॉ. अनिल घनवट, डॉ. मुकुंद माळी यांची उपस्थिती होती. प्रारंभी प्रभारी कुलसचिव तथा क्रीडा संचालक डॉ. अतुल लकडे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. त्यांनी महिला महोत्सवाच्या संकल्पनेची माहिती देताना या उपक्रमातून महिला कर्मचाऱ्यांमध्ये नेतृत्वगुण, संघभावना आणि आत्मविश्वास वृद्धिंगत होईल, असा विश्वास व्यक्त केला.

महिला कर्मचाऱ्यांमधील क्रीडा, सांस्कृतिक आणि कलात्मक क्षमतांना प्रोत्साहन मिळावे, त्यांच्यात परस्पर संवाद व स्नेहभाव वाढावा आणि विविध विद्यापीठांतील महिला कर्मचाऱ्यांना एक समान व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ या पाच विद्यापीठांतील महिला कर्मचारी सहभागी झाल्या आहेत.

उद्घाटनापूर्वी सहभागी महिला कर्मचाऱ्यांनी विद्यापीठ परिसरातून आकर्षक रॅली काढून महोत्सवाचा प्रारंभ केला. त्यानंतर झालेल्या वैयक्तिक गायन स्पर्धेत एकूण ८ गायकांनी सुमधुर सादरीकरण करत वातावरण संगीतमय केले. वैयक्तिक नृत्य स्पर्धेत पारंपरिक तसेच आधुनिक नृत्यशैलींचे मनोहारी दर्शन घडले. यात ७ जणांनी भाग घेऊन उत्साह निर्माण केला. समूह गायन आणि समूह नृत्य स्पर्धांनी तर उपस्थितांची विशेष दाद मिळवत सभागृह अक्षरशः दणाणून सोडले.

यावेळी मार्गदर्शन करताना ज्येष्ठ समाजसेविका चंद्रिका चौहान म्हणाल्या, विद्यापीठाच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांसाठी अशा क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करणे ही अत्यंत स्तुत्य बाब आहे. स्पर्धांमध्ये जय-पराजय असतोच; मात्र यश हे सांघिक प्रयत्नांचे फलित असते. क्रीडा क्षेत्रात जात, वय किंवा इतर कोणतेही भेद नसतात. अपयश आले तरी निराश न होता पुढील संधीसाठी अधिक जोमाने तयारी करणे महत्त्वाचे आहे. पहिल्याच वर्षी राज्यातील पाच विद्यापीठांचा सहभाग मिळणे ही या उपक्रमाची मोठी जमेची बाजू आहे. त्यांनी महिला कर्मचाऱ्यांना एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन करत, मानसिक व शारीरिकदृष्ट्या सक्षम राहून सकारात्मक ऊर्जा जपण्याचा संदेश दिला.

अध्यक्षीय समारोपात कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर म्हणाले, या महिला महोत्सवाच्या निमित्ताने नवीन प्रशासकीय इमारतीतील भव्य सभागृहाचा प्रत्यक्ष वापर सुरू झाला. कोणतीही नवीन सुविधा वापरात आणताना काही अडचणी येतात; मात्र त्यावर मात करत या सभागृहाचा वापर टप्प्याटप्प्याने वाढविला जाईल. विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक विकासाला चालना देण्याबरोबरच हे सभागृह विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थांनाही उपलब्ध करून देण्याचा विद्यापीठाचा मानस आहे, असे ही ते म्हणाले. यावेळी त्यांनी सर्व महिला कर्मचाऱ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ शिवाजी शिंदे आणि डॉ. यशपाल खेडकर यांनी केले.

Previous Post

देवडीत विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप; लोकराज्य फाऊंडेशनचा उपक्रम

Next Post

पोखरापूर जिल्हा परिषद शाळेचा अनोखा उपक्रम; सजवलेल्या बगीतून नवीन विद्यार्थ्यांची जल्लोषात शाळेत एंट्री

Related Posts

राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये ढोल-ताशांच्या गजरात प्रवेश उत्सव
Blog

राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये ढोल-ताशांच्या गजरात प्रवेश उत्सव

June 15, 2026
‘कृषीमित्र’ नावाने सुरू असलेल्या बनावट भरती जाहिरातींपासून सावध राहावे जिल्हा अधिक्षक यांचे आवाहन

राधाकिशन फोमरा मूकबधिर शाळेत पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत
Blog

राधाकिशन फोमरा मूकबधिर शाळेत पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत

June 15, 2026
सोलापूर शहरात आहेत 70 हजार स्ट्रीट लाईट्स, दरमहा दीड कोटी लाईट बिल..!
Blog

सोलापूर शहरात आहेत 70 हजार स्ट्रीट लाईट्स, दरमहा दीड कोटी लाईट बिल..!

June 14, 2026
Next Post
पोखरापूर जिल्हा परिषद शाळेचा अनोखा उपक्रम; सजवलेल्या बगीतून नवीन विद्यार्थ्यांची जल्लोषात शाळेत एंट्री

पोखरापूर जिल्हा परिषद शाळेचा अनोखा उपक्रम; सजवलेल्या बगीतून नवीन विद्यार्थ्यांची जल्लोषात शाळेत एंट्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये ढोल-ताशांच्या गजरात प्रवेश उत्सव

राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये ढोल-ताशांच्या गजरात प्रवेश उत्सव

June 15, 2026
ढोल-ताशांच्या गजरात नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत; उमाबाई श्राविका विद्यालयात प्रवेशोत्सव

ढोल-ताशांच्या गजरात नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत; उमाबाई श्राविका विद्यालयात प्रवेशोत्सव

June 15, 2026
विजय ट्रॉफी २०२६: फायनलमध्ये ‘साऊथ सोलापूर ब्लू’चा ऐतिहासिक विजय

विजय ट्रॉफी २०२६: फायनलमध्ये ‘साऊथ सोलापूर ब्लू’चा ऐतिहासिक विजय

June 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026