• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सर्व नोडल अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

Yes News Marathi by Yes News Marathi
June 10, 2026
in इतर घडामोडी
0
सर्व नोडल अधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
0
SHARES
18
VIEWS

सर्व मतदारांना त्यांचे मतदान केंद्र कोठे आहे याची माहिती द्यावी – निवडणूक निरीक्षक श्रवण हार्डीकर

सोलापूर – महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक 2026 च्या अनुषंगाने नियुक्त करण्यात आलेल्या सर्व नोडल अधिकारी यांनी त्यांच्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडावी. व ही निवडणूक अत्यंत शांततामय वातावरणात व यशस्वीपणे पार पाडावी असे आवाहन जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी केले.

   जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित विधान परिषद निवडणूक स्थानिक प्राधिकरण मतदार संघ बाबत नियुक्त सर्व नोडल अधिकारी यांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कार्तिकेयन मार्गदर्शन करत होते. यावेळी निवडणूक निरीक्षक श्रवण हार्डीकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय कबाडे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे, उप जिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख, प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार, समाज कल्याण सहायक आयुक्त सुलोचना सोनवणे, अन्य धान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांच्या सह अन्य नोडल अधिकारी उपस्थित होते.

 जिल्हाधिकारी कार्तीकेयन म्हणाले की, या निवडणुकीसाठी प्रत्येक उपविभागीय अधिकारी स्तरावर मतदान केंद्र असणार आहेत. या सहा ठिकाणचे वेब कास्टिंग करण्यात येऊन त्याचा नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयात करावा. मतदान व मतमोजणी साठी आवश्यक असलेले साहित्य तयार ठेवावे. एफएसटी, व्हीएसटी व एसएसटी या टीमची स्थापना करून त्या अत्यंत कार्यक्षमपणे काम करतील यासाठी नियोजन करावे. सूक्ष्म निरीक्षक यांची नियुक्ती करून त्यांना प्रशिक्षण द्यावे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात कॉल सेंटर तयार करून ते ऍक्टिव्ह पणे काम करेल हे पहावे. त्याप्रमाणेच निवडणूक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे घ्यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

पोलीस विभागाने ज्यांच्याकडे शस्त्रे आहेत त्या जमा करण्याची कारवाई तात्काळ पूर्ण करावी. निवडणुकीच्या अनुषंगाने चेक पोस्टवर तपासणी मोहीम अत्यंत बारकाईने राबवावी. मतमोजणी झाल्यानंतर मत पेट्या ठेवण्यासाठीची स्ट्रॉंग रूम तयार करावी. मतदान केंद्रावर आरोग्य पथके नियुक्त करावीत. तसेच सर्व संबंधित नोडल अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर सोपवण्यात आलेले जबाबदारी परस्परात योग्य समन्वय ठेवून पार पाडावी अशा सूचना जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी दिल्या.

सर्व मतदारांना त्यांचे मतदान कोणत्या मतदान केंद्रावर आहे याची माहिती द्यावी
– निवडणूक निरीक्षक श्रवण हार्डीकर

महाराष्ट्र विधान परिषद सोलापूर स्थानिक मतदार संघ निवडणुकीसाठी एकूण 616 मतदार आहेत. तसेच 18 जून रोजी जिल्ह्यातील सहा मतदान केंद्रावर यासाठी मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. तरी निवडणूक विभागाने सर्व मतदारांना त्यांचे मतदान कोणत्या मतदान केंद्रावर होणार आहे याची माहिती द्यावी. तसेच राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनाही मतदाराचे मतदान कोणत्या मतदार केंद्रावर आहे याविषयी कळवावे, एकूण मतदारांपैकी कोणी मयत आहेत का याचीही खात्री करावी, अशा सूचना निवडणूक निरीक्षक श्रवण हार्डीकर यांनी दिल्या.

   हार्डीकर पुढे म्हणाले की, पोलीस विभागांने मतदारांना कोणतेही प्रलोभन अथवा जबरदस्ती या अनुषंगाने तक्रारी आल्यास त्यावर तात्काळ कार्यवाही करावी, असे सांगितले. मतदान केंद्राची सुरक्षा, स्ट्रॉंग रूमची सुरक्षा व मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आवश्यक तो बंदोबस्त पोलीस विभागाने ठेवावा. असे त्यांनी सूचित केले.

 प्रारंभिक निवासी उप जिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी विधान परिषद निवडणूक सोलापूर स्थानिक प्राधिकरण मतदारसंघासाठी 28 नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती देऊन प्रत्येकावर सोपवण्यात आलेल्या जबाबदारी विषयी त्यांनी माहिती दिली. तसेच यावेळी सर्व नोडल अधिकाऱ्यांनी आतापर्यंत केलेल्या कामकाजाची माहिती बैठकीत सांगितली.
                ***
Previous Post

सर्व महाविद्यालयांत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी बायोमेट्रिक बंधनकारक!

Next Post

मोदींना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो; सोलापुरात महाआरतीद्वारे प्रार्थना

Related Posts

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश
इतर घडामोडी

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

September 24, 2026
राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

September 24, 2026
५ ऑक्टोबर रोजीचा जिल्हा लोकशाही दिन रद्द..
इतर घडामोडी

५ ऑक्टोबर रोजीचा जिल्हा लोकशाही दिन रद्द..

September 24, 2026
५६६ रुग्णालयांना फायर ऑडिट सक्तीचे; अहवाल सादर करण्याचे आदेश
इतर घडामोडी

५६६ रुग्णालयांना फायर ऑडिट सक्तीचे; अहवाल सादर करण्याचे आदेश

September 24, 2026
आयुष्मान कार्ड निर्मितीत सोलापूर राज्यात दुसरे
इतर घडामोडी

आयुष्मान कार्ड निर्मितीत सोलापूर राज्यात दुसरे

September 24, 2026
रविवारी बँका सुरू राहणार; त्यानंतर तीन दिवसांचा देशव्यापी संप
इतर घडामोडी

रविवारी बँका सुरू राहणार; त्यानंतर तीन दिवसांचा देशव्यापी संप

September 24, 2026
Next Post
मोदींना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो; सोलापुरात महाआरतीद्वारे प्रार्थना

मोदींना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो; सोलापुरात महाआरतीद्वारे प्रार्थना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

रेल्वे स्टेशन परिसरात एमडीची विक्री; सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई

September 24, 2026
नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

September 24, 2026
राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

September 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026