सोलापूर जिल्ह्यातील बोरामणी येथे घडलेल्या तिहेरी हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत 6 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मयत गायत्री मस्के हिचा दीर शंकर उर्फ पप्पू मस्के याच्यासह इतर आरोपींवर गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संपत्तीच्या वादातूनच हे हत्याकांड घडल्याचे समोर आले आहे. मृत गायत्री मस्के हिने संपत्तीतील वाटा तसेच हात उसने दिलेले 25 लाख रुपये परत मिळावेत यासाठी शंकर मस्केकडे तगादा लावला होता. या वादातूनच आरोपीने हत्याकांड केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणात आतापर्यंत 5 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून मुख्य आरोपीच्या शोधासाठी 3 पथके रवाना करण्यात आली आहेत. पुढील तपास सुरू आहे.या घटनेप्रकरणी बीएनएस कलम 103 (अ), 351(2), 3, 5 तसेच शस्त्र कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
