सोलापूर परिसरात झाडावर आढळलेल्या एका अनोख्या पतंगाने नागरिकांचे लक्ष वेधले आहे. पाठीवर मानवी कवटीसारखा स्पष्ट ठिपका असल्यामुळे हा पतंग पाहून अनेकांमध्ये कुतूहल निर्माण झाले. तज्ज्ञांच्या माहितीनुसार हा Death’s-head hawkmoth प्रकारातील पतंग असून तो पूर्णपणे निरुपद्रवी आहे.
हा पतंग प्रामुख्याने रात्री सक्रिय असतो आणि झाडांच्या सालीसारखा रंग असल्याने सहज दिसत नाही. विशेष म्हणजे हा पतंग मधमाशांच्या पोळ्यात जाऊन मध घेतो. कवटीसारख्या चिन्हामुळे अनेक ठिकाणी अपशकुन समजला जात असला तरी वैज्ञानिकदृष्ट्या याचा कोणताही धोका नसल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. निसर्गातील विविधतेचे हे सुंदर उदाहरण असून अशा दुर्मिळ कीटकांचे संवर्धन आवश्यक असल्याचे मत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केले.











