• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

Yes News Marathi by Yes News Marathi
March 5, 2026
in इतर घडामोडी
0
सोलापूरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश
0
SHARES
1
VIEWS

आमदार देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : विद्यार्थ्यांमध्ये आनंदाची भावना

सोलापूर : सोलापुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करावे असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाला दिले आहेत, अशी माहिती आमदार देवेंद्र कोठे यांनी दिली. सोलापुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय होण्यासाठी आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.

या निर्णयामुळे शासकीय पातळीवरील हालचालींना वेग आला असून आगामी शैक्षणिक वर्षात म्हणजेच येत्या जूनपासूनच सोलापुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सोलापुरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्रश्न गेल्या ६० वर्षांपासून प्रलंबित आहे. सोलापूरसाठी मंजूर झालेले शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय इतर शहरात वळविण्यात आले. याबाबत मागणी केल्यानंतर तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रयत्न करून सोलापूरला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला मंजुरी मिळवून दिली. तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या ३४ एकर जागेवर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करता येईल. याकरिता २५० कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करून याच अर्थसंकल्पात त्याकरिता तरतूद करावी आणि येत्या जून महिन्यापासून हे महाविद्यालय सोलापूरात सुरू व्हावे अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी २५ फेब्रुवारी रोजी चालू अधिवेशनात केली होती. याबाबत आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेटही घेतली होती.

त्यांच्या या मागणीला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना आदेश दिले आहेत. थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू व्हावे याकरिता पुढाकार घेतल्याने याबाबत शासकीय पातळीवरील हालचाली अधिक गतिमान झाल्या आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सोलापूर शहर जिल्ह्यातील विद्यार्थी समाज माध्यमांवर आनंद व्यक्त करत आहेत.

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील अधिवेशनानंतर जाणार दिल्लीला

राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील अधिवेशनानंतर एआयसीटीई च्या मान्यतेसाठी स्वतः दिल्ली येथे जाणार आहेत. त्यामुळे सोलापुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याच्या तयारीच्या कामाला मोठी गती मिळणार आहे.

सोलापूरच्या उच्च शिक्षणाच्या प्रवासातील मैलाचा दगड

तरुणांना सोलापुरातच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माध्यमातून अभियांत्रिकीचे शिक्षण मिळावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या मागणीला यश आले याचे समाधान आहे. याकामी उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे सोलापूरला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होत आहे. शासनाच्या या निर्णयाचा सोलापूरकरांना मोठा फायदा होणार असून सोलापूरच्या उच्च शिक्षणाच्या प्रवासातील हा मैलाचा दगड ठरणार आहे.

— देवेंद्र कोठे, आमदार, शहर मध्य

Previous Post

वक्तृत्वाची जादू. संघर्षाची कहाणी.. सोलापूरची ज्योती वाघमारे खासदार होणार..

Next Post

रोमहर्षक लढतीत भारत विजयी; विश्वचषकाच्या ट्रॉफीकडे एक पाऊल जवळ भारताची दमदार फलंदाजी, गोलंदाजांची कमाल;

Related Posts

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!
इतर घडामोडी

राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!

October 14, 2026
उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!
इतर घडामोडी

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

October 14, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक
इतर घडामोडी

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
Next Post
रोमहर्षक लढतीत भारत विजयी; विश्वचषकाच्या ट्रॉफीकडे एक पाऊल जवळ भारताची दमदार फलंदाजी, गोलंदाजांची कमाल;

रोमहर्षक लढतीत भारत विजयी; विश्वचषकाच्या ट्रॉफीकडे एक पाऊल जवळ भारताची दमदार फलंदाजी, गोलंदाजांची कमाल;

ताज्या बातम्या

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026