• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

उमेदच्या माध्यमातून राज्यातील सर्व महिलांना लखपती दीदी बनवण्यात येणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

Yes News Marathi by Yes News Marathi
March 1, 2026
in इतर घडामोडी
0
उमेदच्या माध्यमातून राज्यातील सर्व महिलांना लखपती दीदी बनवण्यात येणार – पालकमंत्री जयकुमार गोरे
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर :- राज्यातील सर्व महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन महिलांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. उमेद च्या माध्यमातून राज्यातील सर्व महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या माध्यमातून सर्व महिलांना लखपती दीदी बनवण्याची ग्वाही राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज्यमंत्री चा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

  नॉर्थ कोर्ट मैदान येथे ग्रामविकास व पंचायत राज विभाग जिल्हा परिषद सोलापूर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सोलापूर उमेद, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आयोजित रुक्मिणी महोत्सव व मिनी सरस जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शन या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते मार्गदर्शन करत होते. यावेळी आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त सचिन ओंबसे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा परिषद सदस्य चेतन केदार ,नगरसेविका रोहिणी तडवळकर, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा श्री. जगताप आदी मान्यवर मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. गोरे म्हणाले की, महिला बचत गटांनी स्वतः उत्पादित केलेल्या मालांचे वस्तूचे विक्री व प्रदर्शन करण्यासाठी हक्काची बाजारपेठ मिळावी म्हणून हा मिनी सरस जिल्हा रुक्मिणी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महिलांची आर्थिक बळकटी व सक्षमीकरणासाठी हा महोत्सव घेण्यात येतो. उमेद च्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्या, त्यांना मानाने, सन्मानाने जगता यावे त्यांना मानाचे स्थान मिळावे यासाठी उमेदच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात, असे त्यांनी सांगितले.

 तसेच महिला बचत गटाच्या माध्यमातून नवनवीन मोठे उद्योग महिलांनी निर्माण करावे, तसेच प्रत्येक गावागावांमधून महिला बचत गटाच्या माध्यमातून प्रत्येक गावी एक प्रभाग संघ निर्माण व्हावे अशी भूमिका ठेवून आपण सर्वांनी काम करावे. गावातील दूध व्यवसाय करणाऱ्या महिलांनी स्वतःची दूध बँक तयार करावी. शेळ्या, मेंढ्या व गाई पालन हा व्यवसाय सर्वात जास्त पैसा मिळवून देणारा ग्रामीण भागातील व्यवसाय आहे. महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून उत्पादित केलेल्या मालाला चांगले पॅकिंग केले तर चांगला पैसा मिळतो. महिलांच्या उत्पादित मालाला हक्काची बाजारपेठ मिळण्यासाठी सोलापूर जिल्ह्यासाठी उमेद मॉल मंजूर केला गेला आहे, अशी ही माहिती पालकमंत्री श्री. गोरे यांनी दिली. उमेद मॉल मुळे सोलापूर जिल्ह्यातील महिलां च्या उत्पादित वस्तूंसाठी बारा महिने हक्काची बाजारपेठ मिळणार आहे . राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यात मुख्यमंत्री महोदयांनी असे मॉल मंजूर केले आहेत.  तसेच गावांमध्येमहिला बचत गटाच्या बैठकीसाठी हक्काचे कार्यालय निर्माण करून देण्याचा प्रस्ताव आम्ही शासनाकडे सादर केला जाणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

महिला स्वयंसहायता समूहांना कर्ज वाटप धनादेश वितरण

कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर महिला बचत गटांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल बक्षीस वितरण करण्यात आले यामध्ये महिला स्वयंसहायता समूहांना समुदायिक गुंतवणूक निधी 32 कोटी 9 लाख 40 हजार रुपये चा धनादेश देण्यात आला,  तसेच महिला स्वयं सहायता समूह बँक कर्जवाटप 2 कोटी 25 लाख रुपयांचा धनादेश वितरित करण्यात आला.  उमेद अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील पहिल्या महिला फेडरेशनच्या नोंदणी पत्राचे वितरण करण्यात आले. सन 2025 - 26 अंतर्गत वार्षिक कृती आराखडा मधील सर्व उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल प्रत्येक तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाचा प्रमाणपत्र देऊन सत्कार पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आला. व त्यानंतर पालकमंत्री महोदयांनी  महोत्सवातील प्रत्येक स्टॉलला भेट देऊन पाहणी केली. 

या महोत्सवात महिला बचत गटांचे 80 स्टॉल लागलेले आहेत. तरी सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या स्टॉलला भेट देऊन महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची खरेदी करावी असे आवाहन करण्यात आले. हे प्रदर्शन नॉर्थ कोर्ट मैदान येथे दिनांक 1 ते 5 मार्च 2026 या कालावधीत आहे. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन व समारोप प्रकल्प संचालक जगताप यांनी केले.
Previous Post

सलग सोळा वर्षापासून दप्तरासह शैक्षणिक साहित्याचे वाटप : शिक्षिका रिंकू जाधवर यांचा उपक्रम

Next Post

TOP 25- दोन्ही उड्डाणपूलांची कामे अंतिम टप्प्यात, सोलापूर- पुणे आणखी फास्ट…!

Related Posts

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!
इतर घडामोडी

राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!

October 14, 2026
उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!
इतर घडामोडी

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

October 14, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक
इतर घडामोडी

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
Next Post
TOP 25- दोन्ही उड्डाणपूलांची कामे अंतिम टप्प्यात, सोलापूर- पुणे आणखी फास्ट…!

TOP 25- दोन्ही उड्डाणपूलांची कामे अंतिम टप्प्यात, सोलापूर- पुणे आणखी फास्ट…!

ताज्या बातम्या

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026