• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचा उद्या दिमाखदार पाळणा सोहळा

Yes News Marathi by Yes News Marathi
February 17, 2026
in इतर घडामोडी
0
शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचा उद्या दिमाखदार पाळणा सोहळा
0
SHARES
1
VIEWS

वीरपत्नी, वीरमाता आणि वीरकन्या यांची असणार उपस्थिती : जिजाऊंच्या वेशात सहभागी होण्याचे महामंडळाचे आवाहन !

सोलापूर – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्यावतीने दरवर्षीप्रमाणे साजरा करण्यात येणाऱ्या शिवाजी महाराज पाळणा सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून यंदाही हा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडणार आहे. बुधवार १८ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री बरोबर ११ वाजता पाळणा सोहळ्याला सुरुवात होणार असल्याची माहिती मध्यवर्ती महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

यावर्षीच्या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे देशासाठी सर्वोच्च बलिदान देताना धारातीर्थी पडलेल्या भारतीय सैन्यामधील सोलापूर शहरातील शहीद जवानांच्या वीरपत्नी, वीरमाता आणि वीरकन्या यांच्या हस्ते पाळणा सोहळा संपन्न होणार आहे. त्याचबरोबर मध्यवर्ती महामंडळाच्या आजी-माजी ट्रस्टींच्या धर्मपत्नी तसेच शिवकन्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असल्याने कार्यक्रमाला विशेष भावनिक आणि प्रेरणादायी स्वरूप लाभणार आहे.

शहरातील महिला भगिनी मोठ्या उत्साहात पारंपरिक वेशभूषेत तसेच जिजाऊंच्या वेशात पाळणा सोहळ्यासाठी सहभागी होणार असून या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर शिवमय होणार आहे. महिलांच्या सुरक्षेचे विशेष नियोजन करण्यात आले असून त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस प्रशासन, स्वयंसेवक तसेच मध्यवर्ती महामंडळाच्या कार्यकर्त्यांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

शिवप्रेमी महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाळणासोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. शहरातील शिवभक्तांसाठी हा सोहळा दरवर्षीप्रमाणेच प्रेरणादायी आणि अविस्मरणीय ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

शिवभक्तांची लक्षवेधी उपस्थिती असणार
कार्यक्रम स्थळी मोठ्या प्रमाणात शिवभक्त उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन एलईडी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे, जेणेकरून सर्वांना सोहळा प्रत्यक्ष पाहता येईल. आकर्षक सजावट, पारंपरिक ढोल-ताशांचा नाद आणि शिवभक्तांच्या जयघोषात हा पाळणा सोहळा अत्यंत दिमाखदार वातावरणात पार पडणार आहे.

यांची उपस्थिती असणार

  • माजी ट्रस्टी अध्यक्ष कै. मुरलीधर घाडगे यांच्या पत्नी माजी उपमहापौर सुषमाताई घाडगे
  • माजी ट्रस्टी सदस्य कै. अर्जुनराव सुरवसे यांच्या धर्मपत्नी यशोदाताई सुरवसे
  • कै. धर्मा भोसले यांच्या धर्मपत्नी सीताबाई भोसले
  • कौ. विजय फुटाणे यांच्या धर्मपत्नी लता फुटाणे
  • ट्रस्टी सदस्य शिवाजीराव घाडगे यांच्या धर्मपत्नी सरोजनी घाडगे
  • ट्रस्टी सदस्य दिलीप कोल्हे यांच्या धर्मपत्नी उपमहापौर मंगला कोल्हे

या वीर पत्नींचा असणार सहभाग

श्रीमती देवकी रत्नाकर हडपद, रेखा शौर्याप्पा नावी, सुषमा दत्तात्रय माने, रत्‍नाबाई बाबुराव चांदोडे.

या शिवकन्यांचा सहभाग

महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा उत्तीर्ण होऊन यश मिळवणाऱ्या सोलापुरातील शिवकन्या संजीवनी ज्योतीराम भोजने, सरोजिनी ज्योतीराम भोजने, अमृता ब्रह्मदेव ननवरे यांचा देखील सहभाग पाळण्यासोळ्यासाठी असणार आहे.

Previous Post

वाचनाने माणूस समृद्ध बनतो: प्रा. श्रीहरी वेदपाठक

Next Post

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची महत्त्वपूर्ण घोषणा

Related Posts

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!
इतर घडामोडी

राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी होणार गोड ; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा.!

October 14, 2026
उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!
इतर घडामोडी

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

October 14, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक
इतर घडामोडी

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
Next Post
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची महत्त्वपूर्ण घोषणा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची महत्त्वपूर्ण घोषणा

ताज्या बातम्या

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026