सोलापूर – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर जिल्हा प्रशासन आणि सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या वतीने सोलापूर शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांद्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अद्वितीय कार्याचा व जीवनमूल्यांचा प्रसार होणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी केले आहे.
कार्यक्रमाचे तपशील पुढीलप्रमाणे, मंगळवार दि. 17 फेब्रुवारी 2026 रोजी हुतात्मा स्मृती मंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित नाट्यप्रयोग तर बुधवार दि. 18 फेब्रुवारी 2026 रोजी श्री शिवछत्रपती रंगभवन येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम संध्याकाळी 6.00 ते 9.00 या वेळेत होणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमात उपस्थित राहावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
