सोलापुरात २ मार्चपासून एस. एल. गायकवाड यांचे चक्री उपोषण; कैकाडी समाजाला एसटी प्रवर्गात समावेश व जमिनीच्या वाटपाची मागणी
सोलापूर : इंग्रजांच्या काळात भटकण्याऱ्या जमातींचा त्रास इंग्रजांना होत होता. काही जमाती क्रांतीकारक उमाजी नाईक, वासुदेव बळवंत फडके यांच्या बरोबर असल्यामुळे इंग्रजांना त्रास देत होत्या. म्हणून 1871 साली इंग्रजांनी गुन्हेगारी कायदा कायदा करुन काही जमातींना सेटलमेंट जमातीची वसाहतीत बंदीस्त करुन ठेवले. हजेऱ्या लावल्या. स्वातंत्र्यानंतर आजही या जमाती तंबूमध्ये, झोपड्यात दगड मातीच्या पत्र्यांच्या कच्च्या घरात राहत आहेत. गुन्हेगारीच्या बेड्या 1952 तुटल्यातरी इतर समाज आजही गुन्हेगार समजतो. त्यामुळे नोकरी, व्यवसाय मिळत नाही. भिकक्षा मागून मिळते काम करुन, मोलमजूरी करुन मरण यातना भोगत आहे.
सोलापूर सेटलमेंट सव्हे नंबर-422, 406, 429 या ठिकाणी बकाल वस्तीत राहणाऱ्या नऊ जमातीच्या लोकांनी नियोजित गृहनिर्माण संस्था करुन जागा नावावर करण्यासाठी प्रयत्न केले, करीत आहेत. परंतु लाल फितीच्या व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जमिनी आमच्या गृहनिर्माण संस्थाच्या नावे झाल्या नाहीत. यास्तव आमची प्रमुख मागणी असे आहे की, आमच्या सेटलमेंट मधील या जमातीच्या नियोजित गृहनिर्माण संस्थेच्या नांवे त्वरीत कराव्यात. या साठी मा.एस.एल. गायकवाड व इतर कार्यकर्ते बेमुदत चक्री उपोषणासाठी बसत आहेत.
या चक्री उपोषणात घुमंतू-विमुक्त समाज महाराष्ट्रचे उपाध्यक्ष एस. एल. गायकवाड, अध्यक्ष डॉ. शिवलाल जाधव,मुढवा, पुणे, कार्याध्यक्ष डॉ. भारत भिमराव जाधव,सोलापूर,उपाध्यक्ष नारायण गायकवाड ,देहूगाव, पुणे, बापू सिद्राम नंदूरकर,सोलापूर, महिला अध्यक्षा उर्मिला पवार,पुणे तसेच महिला उपाध्यक्षा अॅड. रेखा संतोष माने,पुणे आदी पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

