प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र शाळांनी लाभार्थी व उपस्थितीची माहिती ‘सरल’वर ऑनलाईन भरणे अनिवार्य आहे.परंतु काही शाळांकडून ही माहिती नियमितपणे भरली जात नाही. शाळांनी दुपारी दोन वाजेपर्यंत लाभार्थी व उपस्थितीची नोंद न केल्यास आता कारवाई होणार आहे. या योजनेनुसार ग्रामीण व शहरी भागातील पहिली ते आठवी मधील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनाचा लाभ देण्यात येतो. सरल पोर्टलवर माहिती भरण्यास हलगर्जीपणा अथवा दुर्लक्ष केल्यास नियमानुसार संबंधितावर शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित का करण्यात येऊ नयेअसा जाब विचारला जाणार आहे.

