बाजार समितीत राऊतांची एकहाती सत्ता
बार्शीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 18 पैकी 18 संचालक निवडून आणत माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी दिलीप सोपल यांना चारी मुंड्या चीत करत दणदणीत विजय मिळवला.
माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या बळीराजा विकास आघाडीतील दोन संचालक यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित 16 संचालकांसाठी 36 उमेदवार रिंगणात शड्डू ठोकून होते.
आमदार दिलीप सोपल यांच्या नेतृत्वाखालील बार्शी बाजार समिती परिवर्तन आघाडीला एकही खाते उघडता आले नाही. त्यामुळे बार्शी बाजार समितीत राजेंद्र राऊत यांचेच पारडे जड असल्याचे या निकालाने राज्याला दाखवून दिले.यंदा तब्बल 96.98% इतके विक्रमी मतदान झाले होते.

