वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान, सोलापूर यांच्या वतीने समाजातील विवाह योग्य युवक-युवतींना एकत्र आणण्यासाठी व विवाह जुळवण्याच्या उद्देशाने ११ वा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा रविवार, दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत, लिंगशेट्टी मंगल कार्यालय, कस्तुरबा मार्केट जवळ, सोलापूर येथे पार पडणार आहे.
या निमित्ताने मेळाव्यात महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील वीरशैव लिंगायत समाजातील सर्व पोटजातींच्या युवक-युवतींना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. समाजातील सर्व स्तरांतील पालक आणि वधू-वर यांना एकत्र आणून आयुष्याचा योग्य जोडीदार निवडण्यासाठी हा मेळावा उपयुक्त ठरणार आहे. काशीपीठाचे जगदगुरू ज्ञान सिंहासनाधीश्वर श्रीश्रीश्री १००८ डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी व श्रीशैल पीठाचे जगदगुरु श्री श्री श्री १००८ डॉ. चन्नसिद्धाराम शिवाचार्य महास्वामीजी यांच्या आशीर्वादाने हा मेळावा संपन्न होणार आहे.
मेळाव्याचे स्वागताध्यक्षपदी मुंबई उच्च न्यायालय विधीज्ञ ॲड. प्रदीप बसवराज सलगर हे आहेत. तसेच कार्याध्यक्षपद टेंभुर्णी येथील उद्योजक गिरीष ताबे, मंगळवेढ्यातील बागायतदार शेतकरी.नितीन शेट्टी तसेच समाजसेवक आप्पासाहेब मनगुळी हे भुषविणार आहेत. मागील १० वर्षात मेळाव्याच्या माध्यमातून जवळपास ५८६६ जणांचे विवाह जुळविण्यात प्रतिष्ठानला यश आले आहे. तसेच दरवर्षीप्रमाणे यंदाही समाजात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीना वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानतर्फे विशेष पुरस्काराने गौरविण्यात येते.
यंदाच्या वर्षी बांधकाम क्षेत्रातील नामवंत टी ॲन्ड टी इंन्फ्रास्ट्रक्चर लि. कंपनीचे चेअरमन तथा श्री सद्गुरु साखर कारखाना, राजेवाडी ता. आटपाडी संचालक श्रीमंत महालिंग तांदूळकर यांना समाजभुषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे व सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती महादेव अण्णा बाबुराव चाकोते ह्यांना ग्रेपग्रोव्हर फेडरेशन तर्फे द्राक्षभुषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
सदर मेळाव्यात इच्छुक वधूवरांचे व त्यांच्या पालकांचे थेट परिचय, तसेच मागील वर्षातील नोंदणीचे माहिस्तव पुस्तक उपलब्ध असणार आहे. नावनोंदणीसाठी फक्त ५०० रु.माफक फी आकारण्यात आली असून मेळाव्या दिवशी सहभागी होणाऱ्या सर्वांना दुपारी १२ ते ४ पर्यंत खास सोलापूरी धाटणीचे जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे.
तरी समाजातील सर्व विवाहेच्छुक बंधू भगिनींनी या मेळाव्यात नाव नोंदणी करावी असे आवाहन वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येत आहे. नाव नोंदणीसाठी वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान, जयभवानी शाळा मैदान लगत, कुंभारवेस सोलापूर येथील कार्यालयात सकाळी ११ ते संध्या ७ पर्यंत सुनिल शरणार्थी मो.नं. ९४२००८९२९२ यांना संपर्क साधावा.
सदर पत्रकार परिषदेस प्रतिष्ठानचे मार्गदर्शक ॲड. बसवराज सलगर, अध्यक्ष राजशेखर विजापुरे, सिध्दय्या स्वामी, ईरप्पा सालक्की, केदार उंबरजे, गिरीष तांबे, सुनील शरणार्थी, शशिकांत बिराजदार, गिरीष मंद्रुपकर, अनिल वजीरकर, तम्मा कडगंची आदी उपस्थित होते.

