सायबर सुरक्षेच्या संदर्भात केंद्राने ‘संचार साथी ॲप’ विकसित केले असून त्याच्या सक्तीवर गदारोळ उठताच केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी हे ॲप वापरण्याची कोणावर सक्ती नाही असे स्पष्ट केले.
स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी सायबर सुरक्षेच्या संदर्भात तयार करण्यात आलेले सरकारचे संचार साथी ॲप ज्यांना वापरायचे आहे त्यांनी वापरावे, ज्यांना नको आहे त्यांनी तो डिलीट करावा असा बचावात्मक पवित्रा मंगळवारी सरकारने घेतला.
या सक्तीच्या विरोधात काँग्रेसच्या खासदार रेणुका चौधरी यांनी राज्यसभेमध्ये स्थगन प्रस्ताव आणला होता. चौधरी यांनी सभागृहातील नियम 267 अंतर्गत चर्चेची ही मागणी केली.

