वऱ्हाडी मातीचा सुगंध आपल्या काव्यातून जगभर पसरविणारे कविवर्य ‘मिर्झा एक्सप्रेस’ फेम डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे शुक्रवारी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यू समयी ते 68 वर्षांचे होते. त्यांच्यावर अमरावती येथील ईदगाह कब्रस्तानात अंत्यसंस्कार झाले. वऱ्हाडी भाषेची गोडी निर्माण करण्याचे काम डॉक्टर मिर्झांनी आयुष्यभर केले. त्यांच्या कवितांमधूनच मी प्रेरणा घेतली अशी भावना चित्रपट अभिनेते भारत गणेशपुरे यांनी व्यक्त केली.

