शहरवासीयांमध्ये दहशत माजवून दंगे करणाऱ्या दोन टोळ्यांतील 7 गुंडांना पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी सोलापूर व धाराशिव जिल्हा येथून दोन वर्षाकरिता तडीपार केले आहे. एका टोळीतील राम शशिकांत तळभंडारे, विजय कामेश वाघमारे, शिवाजी मारुती तळभंडारे व दुसर्या टोळीतील टोळी प्रमुख मनोज राम गायकवाड, रितेश मनोज गायकवाड, योगेश चंद्रकांत कोळेकर, आनंद राम गायकवाड यांचा समावेश आहे.
या दोन्ही टोळ्यातील या गुंडांनी 2018 ते 2025 या कालावधीमध्ये टोळ्यांवर बेकायदेशीर जमाव जमवून जनतेमध्ये दहशत पसरवणे, दंगे करणे, ठार मारण्याचा प्रयत्न करणे अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले असून त्यांच्या तडीपरीचा आदेश जारी करण्यात आला आहे.

