सोलापूर : अणदूर येथील खंडोबाच्या देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या जीपचा तुळजापूर जवळ टायर फुटून अपघात झाल्याने उळे येथे राहणाऱ्या पूजा हरी शिंदे या महिलेसह तीन महिला जागीच ठार झाल्या.हा अपघात सोलापूर – हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग 65 वर अणदूर नजीक काल दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास झाला.
या अपघातात 12 जण गंभीर जखमी असून उळेगावातील पुजा हरी शिंदे, हडपसर येथील सोनाली माऊली कदम आणि साक्षी बडे यांचा मृत्यू झाला आहे.हे सर्वजण अणदुर येथील खंडोबाच्या दर्शनासाठी जीप मधून निघाले होते.नॅशनल ढाब्याजवळ येताच भरधाव वेगात असलेल्या जीपचा अचानक टायर फुटला आणि चालकाचे नियंत्रण सुटले.सर्व जखमी पुणे आणि उळेगावचे असून त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या संकट काळात अणदुर येथील नागरिक देवदूतासारखे धावून आले. त्यांनी तातडीने मदत कार्य सुरू करून पलटी झालेली जीप सरळ करत जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले.

