राज्यात गेल्या काही वर्षात बी फार्मसी अभ्यासक्रमाच्या कॉलेजमध्ये भरमसाठ वाढ झाल्याने रिक्त जागांचे प्रमाणही वाढले आहे. यंदा बी फार्मसी अभ्यासक्रमाच्या 33 टक्के जागा रिक्त राहिल्या असून पंधरा हजार 936 जागांवर प्रवेश झालेच नाही.
अनेक कॉलेजातील निम्म्या जागा भरल्या गेलेल्या नाहीत. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत अर्थात सीईटी सेल मार्फत बी फार्मसी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. यंदा बी फार्मसी च्या 531 कॉलेजमध्ये 48 हजार 878 जागा होत्या त्यापैकी केवळ 32 हजार 942 जागा भरल्या आहेत. गेल्या वर्षी फार्मसीची 61 नवी कॉलेजेस सुरू झाली असून कोरोना नंतर बी फार्मसीला प्रवेश घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याने नवीन कॉलेजांना परवानगी देण्यात आले. परंतु कोरोना सारखेच विद्यार्थ्यांची प्रवेशाची लाट देखील ओसरल्याचे दिसते.https://youtu.be/E082Ahu35B0

