• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

“भाऊसाहेब गांधी जन्मशताब्दी निमित्त ‘ वृक्षारोपण ‘व ‘स्वच्छता अभियानाला’ सोलापूरकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद “

Yes News Marathi by Yes News Marathi
November 17, 2025
in इतर घडामोडी
0
“भाऊसाहेब गांधी जन्मशताब्दी निमित्त ‘ वृक्षारोपण ‘व ‘स्वच्छता अभियानाला’ सोलापूरकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद “
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर – श्रद्धेय भाऊसाहेब गांधी यांच्या, ‘जन्मशताब्दी वर्ष’ – प्रारंभानिमित्त आयोजित, ‘वृक्षारोपण’ व सामुदायिक ‘स्वच्छता’ अभियाना मध्ये, सोलापूरकरांच्या तसेच,वालचंद शिक्षण समूहातील माध्यमिक, कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालयाच्या विविध विभागातील प्राचार्य, प्राध्यापक, विभाग प्रमुख, तसेच विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे अभूतपूर्व यश मिळवले. कडाक्याच्या थंडीची सकाळ असूनही,वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी प्रांगणात सकाळी ठीक सात वाजता सुरू झालेल्या या उपक्रमात, भाऊसाहेबांच्या कार्याबद्दल नितांत श्रद्धा असणारे, सामाजिक, राजकीय, व्यापारी, धार्मिक क्षेत्रातील निमंत्रित मान्यवर नागरिक, विद्यार्थी, शिक्षकवर्ग, सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते आणि वालचंद शिक्षण समूहातील सर्व सहकाऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.

“संस्कारातून सेवा – सेवेतून शिक्षण”- या प्रेरणादायी घोषवाक्याखाली राबविण्यात आलेल्या या अभियानाचे औपचारिक उद्घाटन सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्या शुभ हस्त झाले. याप्रसंगी, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार प्रमुख ‘अतिथी’ म्हणून,उपस्थित होत्या. तर, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भाऊसाहेब गांधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व वालचंद शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉ.रणजित गांधी यांनी भूषविले. ‘वालचंद शिक्षण समूहाचे ‘विश्वस्त भूषण शहा, थ्वीराज गांधी, पराग शहा, वैभव गांधी तसेच, भारत वर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल जमगे, ‘भारतीय जैन संघटना’ राज्यअध्यक्ष केतन शहा आणि शहरातील विविध जैन मंदिरांचे विश्वस्त आणि मान्यवरांनीही उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

उपक्रमाबद्दल बोलताना डॉ. सचिन ओंबासे म्हणाले, “वृक्षारोपण आणि स्वच्छता या केवळ पर्यावरणीय जबाबदाऱ्या नाहीत, तर त्या आपल्या संस्कार, सेवा आणि शिक्षण या मूल्यांना मजबूत करणाऱ्या आहेत. आज सोलापूरकरांनी दिलेला हा अभूतपूर्व प्रतिसाद हा भाऊसाहेब गांधी यांच्या कार्याला आणि विचारांना दिलेली खरी आदरांजली आहे.” आज स्वच्छता व वृक्षारोपण अभियानातील तरुणाईच्या सामूहिक सहभागामुळे संपूर्ण परिसर स्वच्छ, हरित आणि आरोग्यदायी बनेल अशी आशा व्यक्त केली. वालचंद शिक्षण समूहाने या अभूतपूर्व कार्यक्रमातून सोलापूर शहराला संघटितपणे कार्य करण्याची संघटित एकजूट वृत्ती, पर्यावरणप्रेम आणि सामाजिक जबाबदारी यांचा अनोखा’ संदेश’ दिला. शिस्त, वेळेचे अचूक नियोजन आणि समर्पित सेवाभाव या गुणांनी कार्यक्रमाची उंची वाढवली, अशा शब्दांत डॉ. ओंबासे यांनी अभियानाचे कौतुक केले.

अध्यक्षीय समारोपात डॉ. गांधी म्हणाले, जन्मशताब्दी वर्षानिमित्त राबवलेल्या या प्रारंभिक उपक्रमाने पुढील कैक पिढ्यांसाठी एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला असून, “संस्कारातून सेवा – सेवेतून शिक्षण”- श्रद्धेय भाऊसाहेबांच्या विचाराचा प्रभावी विचार सोलापूरकरांनी पुन्हा एकदा जगासमोर ठेवला. पहाटेची थंडी, गार वारे तरीही कोणाच्याही चेहऱ्यावर तक्रारीचा सुर नव्हता. विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक तसेच लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व जण परिसर स्वच्छ करण्यासाठी उत्साहाने पुढे सरसावले. वृक्षारोपणादरम्यान लावण्यात आलेल्या प्रत्येक रोपाचे ‘दोन ‘वर्षांचे’ पालकत्व’ स्वतः स्वीकारण्याची जबाबदारी वालचंद शिक्षण समूहाने जाहीर केली.

उपक्रमात सामील झालेल्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर दिसणारी आनंदाची आणि सेवाभावाची ऊर्जा भाऊसाहेब गांधी यांच्या संस्कारांचे मूर्त रूप असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. सोलापूर महानगरपालिका,भाऊसाहेब गांधी प्रतिष्ठान आणि वालचंद शिक्षण समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाला, सोलापूरकरांनी अप्रतिम व अभूतपूर्व प्रतिसाद दिला. भाऊसाहेबांच्या या जन्मशताब्दी निमित्तऔचित्य साधून केवळ विद्यार्थ्यांनीच नव्हे तर, शिक्षक, कर्मचारी, स्थानिक रहिवासी, विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते— सगळ्यांनी एकत्र येऊन शहराच्या ‘स्वच्छतेसाठी’ आणि’ हरित’ सोलापूरसाठी ‘स्तुत्य उपक्रम’ राबविला.

Previous Post

शालेय राज्यस्तरीय डायविंग स्पर्धेत श्रावणी सूर्यवंशीची गोल्डन हॅट्ट्रिक

Next Post

नाशिकमधील भोसला स्कूल परिसरात बिबट्या शिरल्याची खबर…

Related Posts

दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!
इतर घडामोडी

दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!

October 13, 2026
मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा
इतर घडामोडी

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!
इतर घडामोडी

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन
इतर घडामोडी

राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन

October 12, 2026
साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक
इतर घडामोडी

साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक

October 12, 2026
Next Post
नाशिकमधील भोसला स्कूल परिसरात बिबट्या शिरल्याची खबर…

नाशिकमधील भोसला स्कूल परिसरात बिबट्या शिरल्याची खबर...

ताज्या बातम्या

दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!

दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!

October 13, 2026
मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026