• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर महानगर पालिकेकडून विमानतळ परिसरातील सर्वेक्षण सुरु….

Yes News Marathi by Yes News Marathi
November 13, 2025
in इतर घडामोडी
0
सोलापूर महानगर पालिकेकडून विमानतळ परिसरातील सर्वेक्षण सुरु….
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर – सोलापूर विमानतळ परिसराची सुरक्षितता अबाधित राहण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद ,यांनी आयुक्त सचिन ओंबसे, पोलीस आयुक्त राजकुमार यांच्या उपस्थितीत विमान प्राधिकरण व संबंधित सर्व विभागांची बैठक आयोजित केली होती. बैठकीतील सूचनांच्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने विमानतळ परिसर लगत राहणाऱ्या सर्व नागरिक, व्यापारी, दवाखाने, मांसाहारी पदार्थ विक्रेते तसेच गॅरेज व्यावसायिक यांना सूचनापत्राद्वारे महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या सूचनापत्रासह सदर भागातील रहिवासी व व्यापारी अतिक्रमणधारक यांचा सर्वे हा वीणा पवार अतिरिक्त आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर महानगरपालिकेच्या पथकाद्वारे सुरू करण्यात आला आहे .

सोलापूर विमानतळाच्या कंपाऊंडवाल लगतच्या भागामध्ये काही नागरिक व व्यापारी यांच्याकडून वारंवार कचरा थेट विमानतळाच्या परिसरात टाकण्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. या कचऱ्यातील खाद्यपदार्थांच्या वासामुळे पाळीव व भटके प्राणी, पक्षी, घारी मोठ्या प्रमाणात त्या भागाकडे आकर्षित होत असून त्यामुळे विमानतळ परिसराच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असे महानगरपालिकेच्या निरीक्षणात आले आहे. तसेच परिसरातील गॅरेजधारकांकडून टायर जाळल्यामुळे निर्माण होणारा धूर व प्रदूषण यामुळे वातावरण दूषित होत असल्याचे देखील निदर्शनास आले आहे.

त्याचप्रमाणे विमानतळाच्या लगतच्या परिसरात काही ठिकाणी नागरिकांकडून गच्चीवरून, शौचालयाच्या भिंतीवरून अथवा उंचावरून पतंग उडविण्याचे प्रकारही दिसून आले असून यामुळे विमान सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच अनधिकृत बांधकामे, पत्रा शेड, शौचालये व अतिक्रमणाची प्रकरणे देखील समोर आली आहेत.

या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी त्या ठिकाणा वरिल सर्व रहिवासी व व्यापाऱ्यांनी आपला कचरा फक्त घंटागाडीतच टाकावा. विमानतळाच्या कंपाऊंडच्या आत किंवा परिसरात कचरा फेकू नये.मटन, चिकन, मच्छी आदी मांसाहारी पदार्थ विक्रेत्यांनी कचरा उघड्यावर फेकता कामा नये. गॅरेज व्यावसायिकांनी टायर, रबर वा अन्य वस्तू जाळून धूर निर्माण करू नये.विमानतळ परिसरातील कोणत्याही घरातून पतंग उडवू नये.विमानतळ कंपाऊंड लगत कोणतेही अनधिकृत बांधकाम, पत्रा शेड, शौचालय उभारू नये; विद्यमान बांधकामे तात्काळ काढून घ्यावीत.कोणतेही अतिक्रमण, शेड, टपऱ्या इ. तात्काळ हटविण्यात याव्यात.विमानतळ कंपाऊंड लगत कोणतेही वाहन, ट्रक इत्यादी उभे करू नये.परिसरातील सर्व दवाखाने यांनी आपला बायोमेडिकल वेस्ट योग्य पद्धतीने नष्ट करावा; तो उघड्यावर टाकल्यास कठोर कारवाई केली जाईल.

महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे की, वरील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे सर्व नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी, गॅरेज व मांसाहारी पदार्थ विक्रेत्यांनी या सूचनांचे गांभीर्याने पालन करून विमानतळ परिसराची स्वच्छता व सुरक्षितता अबाधित ठेवावी, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी केलं आहे.

Previous Post

कलाकार मानधन योजना संदर्भात आशिष शेलार यांना सुधाकर इंगळे यांचे निवेदन

Next Post

प्रतिभावान युवा कलाकारांचे होणार शास्त्रीय संगीत संमेलन..

Related Posts

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा
इतर घडामोडी

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!
इतर घडामोडी

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन
इतर घडामोडी

राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन

October 12, 2026
साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक
इतर घडामोडी

साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक

October 12, 2026
एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे
इतर घडामोडी

एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे

October 12, 2026
Next Post
प्रतिभावान युवा कलाकारांचे होणार शास्त्रीय संगीत संमेलन..

प्रतिभावान युवा कलाकारांचे होणार शास्त्रीय संगीत संमेलन..

ताज्या बातम्या

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026