• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर महानरपालिका निवडणुकीत रिजर्ट दिसणार : मतविभागणी टाळण्यासाठी महाविकास आघाडी करणार : महेश गादेकर यांचा विश्वास

Yes News Marathi by Yes News Marathi
November 10, 2025
in मुख्य बातमी
0
सोलापूर महानरपालिका निवडणुकीत रिजर्ट दिसणार : मतविभागणी टाळण्यासाठी महाविकास आघाडी करणार : महेश गादेकर यांचा विश्वास
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत भाजप हाच आपला प्रमुख विरोधक असणार आहे. भाजपाला पराभूत करण्यासाठी आणि मतविभागणी टाळण्यासाठी महापालिका निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविण्याचा प्रयत्न करणार असल्याचा विश्वास, सोलापूर शहर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नूतन शहराध्यक्ष महेश गादेकर यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. शराध्यक्ष गादेकर म्हणाले, आज पक्षनिष्ठा असणारे कमी आहेत. सर्वांना सत्तेची लालसा लागली आहे. सत्ता असेल त्या पक्षात जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. राष्ट्रवादीमधीलसुद्धा अनेकांनी पक्ष सोडून अन्य पक्षाचा झेंडा हातात घेतला आहे. परंतु जाणारे जात असतात आणि येणारे येत असतात. आयाराम – गयाराम यांच्यामुळे कोणत्याही पक्षाचे फारसे नुकसान होत नाही. सोलापुरात अनेकांनी राष्ट्रवादी पक्ष सोडून अन्य पक्षात प्रवेश केला असल्याने काहीसा परिणाम झाला असला तरी पक्षनिष्ठा कायम असणारेसुद्धा खूप आहेत. तरुण, निष्ठावंत आणि निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांना आगामी महापालिका निवडणुकीत उमेदवारी देण्याबाबत निश्चित विचार केला जाणार असल्याचे सांगत, २०१२ च्या महापालिका निवडणुका आपल्या अध्यक्षतेखाली झाल्यानंतर जवळपास १७ नगरसेवक निवडून आले होते. आगामी निवडणुकीत हा आकडा वाढलेला दिसेल असेही, गादेकर यांनी सांगितले.
सोलापूर महानगरपालिका निवडणूकीसाठी अगदी कमी वेळ मिळाला आहे. सोलापूर शहरात शरद पवार यांना मानणारा व त्यांच्यावर प्रेम करणारा मोठा वर्ग असल्याने तसेच नव्या- जुन्याचा संगम साधून महापालिका निवडणुकीत यश मिळविण्यासाठी प्रयत्न करू, असेही गादेकर म्हणाले.
शिवशाहू फुले आणि आंबेडकर यांचे विचार डोळ्यासमोर ठेऊन राष्ट्रवादी पक्ष वाटचाल करत आहे. सर्वांना सोबत घेऊन आपण निवडणूकीला सामोरे जाणार आहोत. राष्ट्रवादी पक्षात लगेच कोणालाही कोणते पद मिळत नाही. कार्यकर्ता म्हणून काम करावे लागते. आपण युवक काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात केली होती. त्यानंतर शहराध्यक्षपदही यापूर्वी भूषविले आहे. शिवाय विधानसभा निवडणूकसुद्धा लढविली असल्याने अनुभवाच्या जोरावर पुन्हा एकदा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्यावर जबाबदारी दिली आहे. जबाबदारी आपण जोमाने पार पाडणार आहोत, असेही ते म्हणाले. पद्माकर काळे यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडून भाजपात प्रवेश केल्यामुळे पक्षाला फटका बसला काय ? यावर बोलताना गादेकर म्हणून निश्चितच बसला आहे. चांगला कार्यकर्ता पक्ष सोडून गेला आहे. त्याठिकाणी चांगला पर्याय देणार असल्याचे गादेकर म्हणाले.
राष्ट्रवादी पक्ष सोडून गेलेल्यांना म्हणजेच निवडून येण्याचा निकष बघूनच पक्षात घेतले जाईल. परंतु निवडणुकीत तरुणांना जास्तीत जास्त संधी देणार असल्याचे त्यांनी सांगितले. सोलापूर महानगरपालिकेत भाजपाची सत्ता असताना ज्या पद्धतीने शहराचा विकास होणे आवश्यक होते, तसा विकास झालेला नाही. दोन आमदारांच्या भांडणात सोलापूरचा विकास खुंटला असल्याचे सांगत, सोलापूरच्या विकासासाठी राष्ट्रवादी कटीबद्ध असल्याचेही महेश गादेकर म्हणाले. यावेळी शंकर पाटील, भारत जाधव, जनार्दन कारमपुरी,उमरखा बेरिया,रियाज खैरदी, दिनेश शिंदे,चंद्रकांत पवार, प्रशांत बाबर, अक्षय बचूटे,सुनीता रोटे, मनोज गादेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous Post

आज पासून रणधुमाळी.. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू..

Next Post

भाजपची गाडी ‘हाउसफुल्ल ! .. विरोधकांची मदार बंडखोरांवर

Related Posts

मुख्य बातमी

TOP 25 । पावसामुळे पुणेकरांची दाणादाण, लोणावळ्यात 900 मिमी विक्रमी पाऊस, उजनीला फायदा

July 7, 2026
राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 5, 2026
TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!
मुख्य बातमी

TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!

July 5, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 4, 2026
TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!

July 4, 2026
आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश
मुख्य बातमी

बीएलओ नी SIR चे काम राष्ट्रीय कर्तव्य समजून करावे -जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

July 2, 2026
Next Post
भाजपची गाडी ‘हाउसफुल्ल ! .. विरोधकांची मदार बंडखोरांवर

भाजपची गाडी 'हाउसफुल्ल ! .. विरोधकांची मदार बंडखोरांवर

ताज्या बातम्या

पुणे जिल्ह्याला काल मुसळधार पावसाने झोडपून काढले !

पुणे जिल्ह्याला काल मुसळधार पावसाने झोडपून काढले !

July 7, 2026

TOP 25 । पावसामुळे पुणेकरांची दाणादाण, लोणावळ्यात 900 मिमी विक्रमी पाऊस, उजनीला फायदा

July 7, 2026
२४९ रोजंदारी सेवक, १५ वाहनचालक, जुनी पेन्शन व विविध कर्मचारी प्रश्नांवर महापौर कार्यालयात सविस्तर आढावा बैठक

२४९ रोजंदारी सेवक, १५ वाहनचालक, जुनी पेन्शन व विविध कर्मचारी प्रश्नांवर महापौर कार्यालयात सविस्तर आढावा बैठक

July 6, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026