सोलापूर – अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे सोलापूर जिल्ह्यातील सुमारे सात हजार विद्यार्थी बाधित झाले असून त्यांच्या शैक्षणिक साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम साहेब यांनी सर्व समाजघटक, संस्था आणि उद्योगांना पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याचे आवाहन केले होते.

या आव्हानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत, लक्ष्मी हायड्रोलिक्स प्रा. लि. तर्फे सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून मोहोळ तालुक्यातील ११०० पूरग्रस्त विद्यार्थ्यांना अत्यावश्यक शैक्षणिक साहित्याचे किट वाटप करण्यात आले.
हा उपक्रम बुधवार, दि. २९ ऑक्टोबर २०२५ रोजी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोळेगाव येथे पार पडला.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थित मान्यवर म्हणून
कुलदीप जंगम – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर
शरद कृष्ण ठाकरे – व्यवस्थापकीय संचालक, लक्ष्मी हायड्रोलिक्स प्रा. लि.
कादर शेख – शिक्षण अधिकारी
यांची उपस्थिती लाभली.
या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम सांगितले की,
“पूरग्रस्त विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित होता कामा नये. समाजातील प्रत्येक घटकाने शिक्षणासाठी हातभार लावणे ही खरी सामाजिक जबाबदारी आहे.”
LHP MOTORS चे व्यवस्थापकीय संचालक शरद कृष्ण ठाकरे यांनी सांगितले की,“LHP परिवार सदैव समाजहितासाठी तत्पर आहे. शिक्षणासाठी मदत करणे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.”सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोहोळ तालुक्याची गटशिक्षणाधिकारी अविचल महाडिक व सर्व कर्मचारी व शिक्षक यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग, विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, कोळेगाव ग्रामस्थ आणि LHP MOTORS चे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

