सोलापुरातील धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या वतीने मोठ्या लेझीम ताफ्यासह शिस्तबद्ध अशी दिमाखदार मिरवणूक काढण्यात आली. बहारदार मोरांच्या आकर्षक सजावटी समोर तथागत गौतम बुद्ध आणि बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती असलेला मनोहारी देखाव्याने सर्वांचे लक्ष वेधले.
तथागत गौतम बुद्ध व विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करून या लेझीम ताफा मिरवणुकीस उत्साहात प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आ. विजयकुमार देशमुख, पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त गौहर हसन, सहाय्यक आयुक्त राजन माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, माजी नगरसेवक गणेश पुजारी, अमर पुदाले, अनंत जाधव, राष्ट्रवादीचे नेते इरफान शेख,प्रा. प्रसन्न एखंडे, एस. के. फाउंडेशनचे संस्थापक रविकांत कोळेकर, गौतम चंदनशिवे, पीबी ग्रुपचे अध्यक्ष बाबा गायकवाड, भारत बाबरे, अविनाश भडकुंबे, ॲड. विशाल मस्के, ॲड. स्वाती मस्के, चंद्रकांत सोनवणे, धीरज वाघमोडे, जितू मोरे, आदित्य चंदनशिवे, श्रीमंत जाधव, उमर शेख, रवी काकडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे मार्गदर्शक आनंद चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली भव्य मिरवणूक काढण्यात आली. आकर्षक सजावटीसह लक्षवेधक देखावा सादर करण्यात आला होता. या मिरवणुकीत गणवेशामध्ये हजारो कार्यकर्त्यांनी लेझीमचा बहारदार खेळ सादर केला. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे आणि माजी नगरसेवक गणेश पुजारी यांनीही यावेळी लेझीमचा डाव खेळला. यामुळे या मिरवणुकीत चांगलीच रंगत आली. अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततेत ही दिमाखदार मिरवणूक काढण्यात आली. उत्साही वातावरणात ही मिरवणूक काढण्यात आली.
याप्रसंगी सुखदेव इंगळे, धम्मा मैंदर्गीकर,विठ्ठल कांबळे, बापू शिंदे, सुनील गायकवाड, अंबादास कापुरे, सुभाष स्वाके, हृदयनाथ मोकाशी, संजय इंगळे, अमित माने, अभिजीत कापुरे, नुपूर तळभंडारे , अजय इंगळे, अनिल ठोंबरे, उमेश रणदिवे, अल्ताफ शेख भारत सुर्वे, अजिंक्य सुरवसे, अविनाश दंडी, तुळजाराम कडगंची, रवी गाली, आकाश तुपेकर , हुसेन शेख, सलीम शेख, अमोल सुर्वे, वैभव गंगणे , लक्ष्मण वाघमारे , ऋषिकेश गायकवाड, निखिल राऊळ, शुभम सुर्वे, विनोद सावंत, सचिन ओव्हाळ, सचिन तीर्थकर , सागर देडे, आतिश कुचेकर , विशाल गाडे , ओंकार ठोंबरे, जयराज साने , आनंद सिताफळे, रितेश भोसले यांच्यासह पी. बी. ग्रुपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मिरवणुकीद्वारे बुद्ध विचारांचा संदेश : आनंद चंदनशिवे
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त काढण्यात आलेल्या या मिरवणुकीद्वारे शांती व अहिंसेचा तथागत बुद्धांचा धम्म संदेश देण्यात आला. या मिरवणुकीत सर्व जाती-धर्मातील लोक सहभागी होतात. आज जगाला तथागत बुद्ध आणि डॉ. आंबेडकरांच्या विचारांची नितांत गरज आहे, अशी भावना मंडळाचे मार्गदर्शक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी व्यक्त केली.









