• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पथसंचलनातून दिसली संघासाधना व राष्ट्रभक्तीची प्रेरणा…

Yes News Marathi by Yes News Marathi
October 2, 2025
in इतर घडामोडी
0
पथसंचलनातून दिसली संघासाधना व राष्ट्रभक्तीची प्रेरणा…
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक शताब्दी वर्षानिमित्त गुरुवारी सकाळी संघदृष्ट्या सात नगरातील स्वयंसेवकांचे शिस्तबद्ध पथ संचलन पार पडले. या संचालनाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघशक्तीचे विराट दर्शन झाले. पथसंचलनातून शंभर वर्षाची संघसाधना व राष्ट्रभक्तीची प्रेरणा नागरिकांनी अनुभवली. हजारो स्वयंसेवकांनी घोषाच्या तालावर शिस्तबद्ध पद्धतीने विविध मार्गावरून पथसंचलनाद्वारे देशभक्तीचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला.

शहरातील विविध मार्गावरून रा.स्व.संघाची शिस्त, एकजूट, राष्ट्रनिष्ठा याचे विराट दर्शन या संचलनाच्या माध्यमातून नागरिकांना घडले. मध्यभागी चार ध्वजरक्षक स्वयंसेवकांसह मध्यभागी परम पवित्र भगवा ध्वज त्यापुढे व पाठीमागे स्वयंसेवकांच्या तुकड्या (वाहिनी) असा पथसंचालनाचा साज होता. संघ स्थापनेच्या शताब्दी वर्षाच्या पंचसूत्री कार्यक्रमांची सुरुवात या संचलनापासून झाली आहे. गुरुवारी काही ठिकाणी सकाळच्या सत्रात तर काही ठिकाणी संध्याकाळच्या सुमारास प्रत्येक शहरातील मुख्य मार्गावरून हे ‘पथसंचलन’ झाले. पूर्ण गणवेशात (खाकी पॅन्ट आणि पांढरा शर्ट) असलेल्या हजारो स्वयंसेवकांनी संचलनात सहभाग घेतला.

संचलन मार्गावर दोन्ही बाजूंनी उभे असलेल्या नागरिकांनी स्वयंसेवकांवर पुष्पवृष्टी करून त्यांचे जोरदार स्वागत केले. अनेक ठिकाणी महिलांनी औक्षण करून या संचलनाला आपला पाठिंबा दर्शवला. देशभक्तिमय वातावरणात पथसंचलन व उत्सव दोन्ही पार पडले.


शताब्दी वर्षानिमित्त संचलनाद्वारे सामाजिक बांधिलकी व मूल्यांचा प्रसार देशातील शेवटच्या घटकांपर्यंत करण्यास सुरुवात झाली आहे. यातून सामाजिक समरसता कुटुंब प्रबोधन पर्यावरण संरक्षण स्वबोध आणि नागरी शिष्टाचार या पंचसूत्री बाबत आगामी काळात कर्तव्य करण्याचा संदेश देण्यात आला. ​”प्रत्येक स्वयंसेवकाने आपापल्या क्षेत्रात सक्रिय राहून समाज परिवर्तनाचे काम करावे,” हा या संचलनाचा मुख्य संदेश विविध वक्त्यांनी उत्सवात मांडला.

सेवाभारतीतर्फे पूरग्रस्तांना मदतीचे आवाहन
सेवाभारतीच्या माध्यमातून महापूरामुळे बाधित झालेल्या गावांमध्ये जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्याचे कार्य हाती घेण्यात आले आहे. शिवस्मारक येथे या वस्तूंचे किट करण्याचे कार्य सुरू आहे. सफाई व आरोग्य विषयात स्वयंसेवक गावागावात जाऊन सेवाकार्य करत आहेत. पूरग्रस्त ठिकाणी सर्व स्वयंसेवकांनी व नागरिकांनीही मदत करावी, असे आवाहन सेवाभारतीतर्फे करण्यात आले आहे.

गुरूवारी या नगरांचे झाले पथसंचलन
विडी घरकुल ई ग्रुप परमेश्वरी देवी मंदिर येथून केशव नगर, साक्षी गणपती, मल्लिकार्जुन नगर येथून पंचमूर्ती नगरचे, सैफूल येथील कित्तुर नगर येथून रेवणसिद्धेश्वर नगरचे, दाजी पेठेतील श्रीराम मंदिर येथून अशोक नगरचे, तिरूमला पॅराडेज येथून दयानंद नगरचे, ढोबळे डि.एड्, महाविद्यालय जुळे सोलापूर येथून हनुमान नगरचे, पाथरूट चौक येथून संभाजी नगरचे संचलन पार पडले व त्यानंतर शस्त्रपूजन उत्सवात राष्ट्रीय पंचसूत्री कार्यक्रमाबद्दल स्वयंसेवकांना उद्बोधन करण्यात आले.

Previous Post

मध्य रेल्वेत स्वच्छता पंधरवडा – २०२५ ला सुरूवात..

Next Post

प्रबुध्द भारत तरुण मंडळाची धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त लक्षवेधक मिरवणूक

Related Posts

कन्नड भाषेच्या जतनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज
इतर घडामोडी

कन्नड भाषेच्या जतनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

June 20, 2026
गुगलच्या साथीने महाराष्ट्र सज्ज; 4 लाख शिक्षक शिकणार AI चे धडे
इतर घडामोडी

गुगलच्या साथीने महाराष्ट्र सज्ज; 4 लाख शिक्षक शिकणार AI चे धडे

June 20, 2026
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारती विद्यापीठ-शैक्षणिक संकुल सोलापूर योगाभ्यासाचे आयोजन
इतर घडामोडी

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारती विद्यापीठ-शैक्षणिक संकुल सोलापूर योगाभ्यासाचे आयोजन

June 20, 2026
सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक
इतर घडामोडी

सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक

June 19, 2026
आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच
इतर घडामोडी

आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच

June 19, 2026
जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त शिवछत्रपती पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या पालकांचा सत्कार
इतर घडामोडी

जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त शिवछत्रपती पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या पालकांचा सत्कार

June 19, 2026
Next Post
प्रबुध्द भारत तरुण मंडळाची धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त लक्षवेधक मिरवणूक

प्रबुध्द भारत तरुण मंडळाची धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त लक्षवेधक मिरवणूक

ताज्या बातम्या

निमा सोलापूर तर्फे जागतिक योग दिन उत्साहात साजरा

निमा सोलापूर तर्फे जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 21, 2026
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारती विद्यापीठ-शैक्षणिक संकुल सोलापूर योगाभ्यासाचे आयोजन

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारती विद्यापीठ-शैक्षणिक संकुल सोलापूर योगाभ्यासाचे आयोजन

June 21, 2026
एनसीसी कॅडेट्सचा योग दिन उत्साहात साजरा

एनसीसी कॅडेट्सचा योग दिन उत्साहात साजरा

June 21, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026