• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर जिल्ह्याच्या 95 गावांपैकी 74 गावांचा वीज पुरवठा सुरळीत – अधीक्षक अभियंता सुनील माने

Yes News Marathi by Yes News Marathi
September 30, 2025
in इतर घडामोडी
0
सोलापूर जिल्ह्याच्या 95 गावांपैकी 74 गावांचा वीज पुरवठा सुरळीत – अधीक्षक अभियंता सुनील माने
0
SHARES
0
VIEWS

• उर्वरीत 21 गावांचा वीज पुरवठा प्राधान्याने दोन दिवसात पुर्ववत करण्यास महावितरण प्रयत्नशील आहे


• मोहोळ ते भांबेवाडी येथे पोल जवळ 25 फुटापर्यंत पाणी असूनही महावितरण कर्मचाऱ्यांनी बोटीत जाऊन वीजपुरवठा सुरळीत केला.


• अक्कलकोट तालुक्यात 11 केव्ही कोर्सेगाव वाहिनीवर सिना नदीच्या पात्रात असलेल्या 11 केव्ही वाहिनीच्या पोल जवळ पडलेले झाड गोटयाळ गावातील वायरमन यांनी नदीच्या पाण्यात पोहोत जाऊन काढले व बाधित भाग बंद करून इतर भागाचा वीजपुरवठा सुरळीत केला.

सोलापूर – जिल्हयात झालेल्या अतिवृष्टीमुळे व सीना नदीला आलेल्या पुराने दि.15 ते दि.24 सप्टेंबर 2025 पर्यंत महावितरण सोलापूर मंडळ अंतर्गत एकूण 95 गावांचा वीज पुरवठा पुर्णत: खंडीत झालेला होता. परंतु गावातील पुराचे पाणी कमी झाल्यानंतर महावितरण कंपनीने तात्काळ 74 गावातील वीजपुरवठा पूर्ववत केलेला आहे, अशी माहिती महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता सुनील माने यांनी दिली आहे.

सोलापूर जिल्हयातील महावितरणचे 33/11 केव्ही क्षमतेचे एकूण 19 उपकेंद्र अतिवृष्टीमुळे व पूराचे पाणी उपकेंद्रात गेल्याने बंद करण्यात आले होते. करमाळा तालुक्यातील आवाटी, मोहोळ तालुक्यातील लांबोटी व भांबेवाडी, माढा तालुक्यातील कुंभेज, दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद, हत्तरसंगकुडल व वडकबाळ, अक्कलकोट तालुक्यातील कोर्सेगाव, गुडडेवाडी ही उपकेंद्र बाधित झाली होती. त्यामुळे 11 केव्ही क्षमतेच्या एकूण 92 वाहिन्यांचा वीज पुरवठा खंडीत झाला होता. सदर 92 वाहिन्या बंद असल्याने एकूण 28 हजार 59 घरगुती ग्राहक व 39 हजार 41 शेती पंप ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत झालेला होता, अशी माहिती वीज वितरण कंपनीकडून देण्यात आलेली आहे.


तसेच सीना नदीकाठ भागात असलेले महावितरणचे शेतीपंपास वीज पुरवठा करणारे एकूण 5 हजार 604 वितरण रोहित्र फार मोठया प्रमाणात पाण्याखाली गेल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने सदर वितरण रोहित्रांचा वीज पुरवठा खंडीत झाला होता. महावितरणचे अंदाजे नुकसान 25 ते 30 कोटी पर्यंत झाल्याचे आढळून आले आहे.


महावितरणचे सर्व अभियंते व क्षेत्रीय कर्मचारी यांनी रात्रंदिवस प्रयत्न करून दि.24 सप्टेंबर 2025 पर्यंत एकूण 95 गावांपैकी 74 गावांचा वीज पुरवठा सुरळीत केलेला आहे. उर्वरित 21 गावे यांना वीज पुरवठा करणाऱ्या वाहिन्या व रोहित्र दि. 24 सप्टेंबर.2025 पर्यंत पुर्णत: पाण्यात असल्याने त्यांचा वीज पुरवठा अद्यापही खंडीत आहे. ज्या भागातील वीज पुरवठा खंडीत होता त्याभागात इतर उपकेंद्रामधून पर्यायी 11 केव्ही वाहिन्यांव्दारे वीज पुरवठा करून सुरळीत करण्यात आलेला आहे, अशी माहिती श्री. माने यांनी दिली.


सोलापूर मंडळ अंतर्गत जेऊर उपविभागात 33 केव्ही वाहिनी चे 7 पोल पुराच्या पाण्यात पुर्णत: पडलेले असताना देखील पर्यायी 33 केव्ही वाहिनीव्दारे 7 गावांचा वीज पुरवठा मोठया प्रमाणत पाऊस असताना देखील 24 तासाच्या आत पुर्ववत करण्यात यश आले आहे, असे श्री.माने यांनी सांगितले.


तसेच करमाळा, माढा, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर या सर्व उपविभांगामध्ये देखील सर्व कर्मचारी अधिकारी यांनी अहोरात्र काम करून गावठाण भागातील वीज पुरवठा कसा पुर्ववत होईल याकडे लक्ष देऊन जास्तीत जास्त ग्राहकांना वीज सेवा उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न केले जात आहेत.


या वीज पुरवठा पुर्ववत झालेल्या 74 गावांपैकी काही गावे दि. 25 सप्टेंबर 2025 रोजी परत एकदा सीना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने बाधीत झाली होती. ती सर्व गावे 24 तासाच्या आत पुर्ववत करण्यात महावितरणला यश आले आहे. मोहोळ तालुक्यातील मोहोळ ते भांबेवाडी या 33 केव्ही वाहिनीचे पोल वरील एका फेजचे जम्प तुटल्याने दि.27 सप्टेंबर 2025 रोजी पोलच्या बुडात 25 फुटापर्यंत पाणी साचलेले असताना सुध्दा बोटीच्या साहयाने पोल पर्यंत पोहचून सदर वाहिनीचा वीज पुरवठा पुर्ववत करण्यात आला.


अक्कलकोट तालुक्यातील 11 केव्ही कोर्सेगाव वीजवाहिनीवर, सिना नदीच्या पात्रात असलेल्या पोलजवळ एक झाड कोसळले होते. यामुळे वीजपुरवठा बाधित झाला होता. गोटयाळ गावातील वायरमन यांनी अत्यंत धाडसाने नदीच्या पाण्यात पोहून जाऊन झाड हटवले आणि बाधित भाग बंद करून इतर परिसराचा वीजपुरवठा सुरळीत केला.


ही घटना प्रशासकीय तत्परता आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यनिष्ठेचे उदाहरण ठरली असून, अशा संकटसमयी तातडीने हस्तक्षेप करून जनतेला दिलासा देण्याचे कार्य कौतुकास्पद आहे.
नदीकाठच्या भागात अनेक शेतीपंप वाहिन्या व रोहित्र अद्यापही पाणी व गाळात अडकलेले आहेत. त्यामुळे पाणी ओसरल्यानंतर आणि पोल उभे करण्यास योग्य परिस्थिती निर्माण झाल्यावर, त्या ठिकाणी तात्काळ देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेऊन वीजपुरवठा पूर्ववत केला जात आहे.


या कार्यासाठी महावितरणकडे 262 सूचीबद्ध कंत्राटदार सज्ज असून, त्यांच्याकडे आवश्यक साहित्य व मनुष्यबळ उपलब्ध आहे. सध्या 21 गावांचा वीजपुरवठा अद्यापही खंडित असून, येत्या दोन दिवसांत प्राधान्याने वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरण प्रयत्नशील आहे.


ही कार्यवाही वीज वितरण कंपनीची तत्परता, नियोजनबद्धता आणि नागरिकांच्या गरजांप्रतीची संवेदनशीलता आहे.

Previous Post

Next Post

सोलापूर पुणे महामार्गावर अरण गावच्या हद्दीत भरधाव ट्रकमध्ये स्वयंपाक करताना आग लागली…

Related Posts

कन्नड भाषेच्या जतनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज
इतर घडामोडी

कन्नड भाषेच्या जतनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

June 20, 2026
गुगलच्या साथीने महाराष्ट्र सज्ज; 4 लाख शिक्षक शिकणार AI चे धडे
इतर घडामोडी

गुगलच्या साथीने महाराष्ट्र सज्ज; 4 लाख शिक्षक शिकणार AI चे धडे

June 20, 2026
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारती विद्यापीठ-शैक्षणिक संकुल सोलापूर योगाभ्यासाचे आयोजन
इतर घडामोडी

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारती विद्यापीठ-शैक्षणिक संकुल सोलापूर योगाभ्यासाचे आयोजन

June 20, 2026
सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक
इतर घडामोडी

सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्या संदर्भात महापौरांनी घेतली बैठक

June 19, 2026
आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच
इतर घडामोडी

आफ्रिकेतील जागतिक अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सोलापूर पोलिसांचा झेंडा उंच

June 19, 2026
जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त शिवछत्रपती पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या पालकांचा सत्कार
इतर घडामोडी

जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त शिवछत्रपती पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या पालकांचा सत्कार

June 19, 2026
Next Post
सोलापूर पुणे महामार्गावर अरण गावच्या हद्दीत भरधाव ट्रकमध्ये स्वयंपाक करताना आग लागली…

सोलापूर पुणे महामार्गावर अरण गावच्या हद्दीत भरधाव ट्रकमध्ये स्वयंपाक करताना आग लागली…

ताज्या बातम्या

कन्नड भाषेच्या जतनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

कन्नड भाषेच्या जतनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

June 20, 2026
गुगलच्या साथीने महाराष्ट्र सज्ज; 4 लाख शिक्षक शिकणार AI चे धडे

गुगलच्या साथीने महाराष्ट्र सज्ज; 4 लाख शिक्षक शिकणार AI चे धडे

June 20, 2026
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारती विद्यापीठ-शैक्षणिक संकुल सोलापूर योगाभ्यासाचे आयोजन

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारती विद्यापीठ-शैक्षणिक संकुल सोलापूर योगाभ्यासाचे आयोजन

June 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026