• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जागतिक हृदय दिनानिमित्त एसीएस सायक्लोथॉन उत्साहात

Yes News Marathi by Yes News Marathi
September 28, 2025
in इतर घडामोडी
0
जागतिक हृदय दिनानिमित्त एसीएस सायक्लोथॉन उत्साहात
0
SHARES
0
VIEWS

अप्पर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर आणि आयएमएच्या अध्यक्षा डॉ. मंजुषा शहा यांच्या हस्ते उदघाटन : चक्क एन्जोप्लास्टी झालेल्या नागरिकांनीही चालवली सायकल

सोलापूर : जागतिक हृदय दिनानिमित्त एसीएस हॉस्पिटल आणि रॉयल रायडर्स सायकलिंग असोसिएशनतर्फे रविवारी एसीएस सायक्लोथॉन २०२५ उत्साहात झाली. भैय्या चौक येथील एसीएस हॉस्पिटल येथे अप्पर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर आणि आयएमएच्या अध्यक्षा डॉ. मंजुषा शहा यांच्या हस्ते एसीएस सायक्लोथॉनचे उदघाटन करण्यात आले. विशेष म्हणजे १० किलोमीटरच्या या सायक्लोथॉनमध्ये एन्जोप्लास्टी झालेल्या अनेक जणांनीही सहभाग घेत समाजाला सुदृढ आरोग्याचा अनोखा संदेश दिला.

दररोज सायकल चालवल्यामुळे हृदय मजबूत होते, हृदयाचे पंपिंग वाढते, ऑक्सिजन पुरवठा वाढतो, मसल्स स्ट्रॉंग बनतात व शरीराचा सर्वांगीण विकास होतो. हा संदेश देण्यासाठी या सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले होते. भैय्या चौक येथून सुरू झालेली ही सायक्लोथॉन छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक, एस टी स्टॅन्ड, बाळीवेस, मधला मारुती, श्री आजोबा गणपती, जिल्हा परिषद, रंग भवन, हरीभाई देवकरण शाळा, डफरीन चौक, महापौर निवास, गांधी पुतळा, रेल्वे स्थानक, भैय्या चौक, रामलाल चौकमार्गे एसीएस हॉस्पिटल येथे विसर्जित झाली.

अप्पर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर म्हणाले, आपली जीवनशैली व्यायामयुक्त असेल तर हृदय मजबूत राहते. तसेच हृदयरोग किंवा अन्य आजार होण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे नागरिकांनी सायकल चालविण्यासह विविध व्यायामाकडे लक्ष द्यावे. डॉ. प्रमोद पवार म्हणाले, एन्जोप्लास्टी नंतर हृदय कमकुवत होते, हा समाजातील गैरसमज आहे. प्रत्येकाने दैनंदिन जीवनात व्यायामाचा अंगीकार केला तर हृदयावरील शस्त्रक्रियेनंतरही निरोगी आणि सुदृढ जीवन जगता येऊ शकते. डॉ. सिद्धांत गांधी म्हणाले, हृदय शस्त्रक्रिया झाल्यानंतर पुढील आयुष्य निरोगी आणि सुदृढ राहणार नाही, अशी शंका अनेकांच्या मनात असते. परंतु एन्जोप्लास्टी झालेल्या अनेकांनी १० किमीच्या एसीएस सायक्लोथॉनमध्ये सहभागी होऊन हा समज खोटा ठरविला आहे.

यावेळी डॉ. सिद्धांत गांधी, डॉ. प्रमोद पवार, डॉ. राहुल कारीमुंगी, डॉ. दीपक गायकवाड, डॉ. मंजुषा शहा आदी उपस्थित होते.

Previous Post

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऑगस्टमधील मदत मंजूर, सप्टेंबर महिन्याची नुकसान भरपाई लवकरच देणार-कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

Next Post

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या शर्थीच्या प्रयत्नातून मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध

Related Posts

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन
इतर घडामोडी

राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन

October 12, 2026
साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक
इतर घडामोडी

साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक

October 12, 2026
एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे
इतर घडामोडी

एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे

October 12, 2026
बाजार आवाराबाहेर फळे-भाजीपाला खरेदीसाठी परवानाच बंधनकारक
इतर घडामोडी

बाजार आवाराबाहेर फळे-भाजीपाला खरेदीसाठी परवानाच बंधनकारक

October 12, 2026
स्थानिक स्वराज्य संस्थांनी १६ ऑक्टोबरपासून पाणीवापरात १० टक्के कपात करावी; जिल्हाधिकारी
इतर घडामोडी

स्थानिक स्वराज्य संस्थांनी १६ ऑक्टोबरपासून पाणीवापरात १० टक्के कपात करावी; जिल्हाधिकारी

October 12, 2026
Next Post
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या शर्थीच्या प्रयत्नातून मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या शर्थीच्या प्रयत्नातून मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध

ताज्या बातम्या

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेच्या शिक्षेतून मायलेकींची उच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता

खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेच्या शिक्षेतून मायलेकींची उच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता

October 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026