• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऑगस्टमधील मदत मंजूर, सप्टेंबर महिन्याची नुकसान भरपाई लवकरच देणार-कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

Yes News Marathi by Yes News Marathi
September 27, 2025
in इतर घडामोडी
0
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऑगस्टमधील मदत मंजूर, सप्टेंबर महिन्याची नुकसान भरपाई लवकरच देणार-कृषी मंत्री दत्तात्रय भरणे
0
SHARES
0
VIEWS

सोलापूरमध्ये अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान, भर पावसात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा पाहणी दौरा!

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागाची केली पाहणी!

सोलापूर, दिनांक २७: “सोलापूर जिल्ह्यात प्राथमिक स्वरूपात अंदाजीत १० लाख २० हजार ९१७ एकर क्षेत्राचं नुकसान झालं आहे. तर, राज्यात ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये प्राथमिक अंदाजानुसार ३७ लाख ९१ हजार ३२१ हेक्टर म्हणजे ९४ लाख ७८ हजार ३०२ एकर क्षेत्र बाधित आहे. ऑगस्ट महिन्यातील पंचनामे पूर्ण होऊन ५९.७९ कोटींचा मदत निधी जाहीर करण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्यातील पंचनामे महिन्याअखेरीस पर्यंत पूर्ण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येईल. तसेच प्राथमिक अंदाजानुसार सोलापूर जिल्ह्याकरीता सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीपोटी ३९३.७९ कोटी रुपयांच्या अपेक्षित निधीची गरज भासू शकते” अशी प्रतिक्रिया कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. तसेच येत्या मंत्रीमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली नुकसानग्रस्त शेतक-यांना भरीव मदत देण्यासाठी चर्चा करु असेही म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.त्यांनी माढा तालुक्यातील उंदरगाव व मोहोळ तालुक्यातील पासलेवाडी आणि नांदगाव यासह दोन्ही तालुक्यातील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी केली. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन मंत्री दत्तात्रय भरणे यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील, माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील, मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू खरे, उमेश पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांच्यासह महसूल विभाग, पाणीपुरवठा विभाग, ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्यात सर्वत्र जास्त पाऊस पडल्याने नुकसान ही वाढलं आहे. कृषी विभाग आणि महसूल विभागाकडून पंचनाम्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं सर्व परिस्थितीवर बारकाईनं लक्ष आहे. सरकारने यावपूर्वीच २२१५ कोटींची मदत जाहीर केली आहे. पंचनामे पूर्ण होतील तशी मदत जाहीर होईल. या संकट काळात केंद्र सरकारकडून मदत मिळावी यासाठी काल केंद्रीय मंत्री अमित शहांना पत्र देखील देण्यात आलं आहे. तसंच, आज आणि उद्या हवामान विभागाने रेड अलर्ट दिल्याने पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी आणि नदीनाले, ओढे, पूल अशा ठिकाणांपासून दूर राहण्याचे आवाहन केलं.

सीना नदीची वहनक्षमता ५० हजार क्युसेकची असताना सुमारे दोन लाख क्युसेक इतकं पाणी नदी पात्रातून वाहिल्यानं सीना नदीनं पात्र सोडलं आहे. त्यामुळे थेट माढा व मोहोळ तालुक्यातील गावे आणि शिवारांमध्ये पाणी शिरल्यानं प्रचंड हानी झाली आहे.पाहणी दरम्यान शेतकऱ्यांनी सोयाबीन, उडीत, तूर, ऊस, मका यांसारख्या पिकांचे नुकसान, जमिनीवर पाणी साचल्याने उभ्या पिकांची झालेली हानी, रस्ते व पायाभूत सुविधांवर झालेला परिणाम याबाबत कृषी मंत्री भरणेंना माहिती दिली. यावर गांभीर्यानं लक्ष देत मंत्री भरणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याचा पंचनामा करण्यात यावा. शेती, गुरं, विहिरी या सर्व गोष्टींचे पंचनामे करण्याचे आदेश दिले.

मंत्री भरणे म्हणाले की, “सीना व भीमा नदीला आलेल्या महापूरानं जिल्ह्यातील १२९ गावांना पाण्यानं वेढा घातलेला आहे. ऑगस्टमध्ये ६ तर सप्टेंबरमध्ये ११ तालुक्यातील ८७७ गावांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. त्यामध्ये द.सोलापूर,उ.सोलापूर,बार्शी,अक्कलकोट,मोहोळ,माढा,करमाळा,पंढरपूर,सांगोला,माळशिरस व मंगळवेढा आदी तालुक्यांचा समावेश आहे. तसेच या दोन्ही महिन्यात एकूण ४ लाख २८ हजार १०७ शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे.शेतकऱ्यांना न्याय मिळावा ही राज्य शासनाची प्राथमिकता आहे. तसंच, कुठल्याही शेतकऱ्याला मदतीपासून वंचित ठेवलं जाणार नाही.” ते सोलापुरात नुकसाग्रस्त भागाच्या पाहणीदारम्यान बोलत होते.

सोलापूरला पुढील 2 दिवस येलो अलर्ट
सोलापूर शहर आणि जिल्ह्यासाठी हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे अतिवृष्टी होऊ शकते. सध्या सोलापूर शहर आणि जिल्ह्यात अत्यंत विदारक परिस्थिती आहे. प्रशासनाने नागरिकांना विशेष आवाहन केले असून गरज असेल तरच घराबाहेर पडावे. तसेच, नद्यांना पूर येण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये, अशा सूचना दिल्या आहेत.
मोहोळ तालुक्यातील पासलेवाडी व नांदगाव येथील पूरग्रस्त बाधितांना एमआयटी संस्थेमार्फत गृहपयोगी किट मदत म्हणून देण्यात आले होते, त्या किटचे वाटप कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते दोन्ही गावातील बाधित नागरिकांना यावेळी करण्यात आले.

Previous Post

सोलापूर महानगरपालिका वतीने शहरातील प्रमुख दुय्यम रस्ते दुभाजक व आइलंड सुशोभीकरणासाठी प्रस्ताव मागविणे संदर्भात आवाहन

Next Post

जागतिक हृदय दिनानिमित्त एसीएस सायक्लोथॉन उत्साहात

Related Posts

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन
इतर घडामोडी

राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन

October 12, 2026
साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक
इतर घडामोडी

साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक

October 12, 2026
एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे
इतर घडामोडी

एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे

October 12, 2026
बाजार आवाराबाहेर फळे-भाजीपाला खरेदीसाठी परवानाच बंधनकारक
इतर घडामोडी

बाजार आवाराबाहेर फळे-भाजीपाला खरेदीसाठी परवानाच बंधनकारक

October 12, 2026
स्थानिक स्वराज्य संस्थांनी १६ ऑक्टोबरपासून पाणीवापरात १० टक्के कपात करावी; जिल्हाधिकारी
इतर घडामोडी

स्थानिक स्वराज्य संस्थांनी १६ ऑक्टोबरपासून पाणीवापरात १० टक्के कपात करावी; जिल्हाधिकारी

October 12, 2026
Next Post
जागतिक हृदय दिनानिमित्त एसीएस सायक्लोथॉन उत्साहात

जागतिक हृदय दिनानिमित्त एसीएस सायक्लोथॉन उत्साहात

ताज्या बातम्या

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेच्या शिक्षेतून मायलेकींची उच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता

खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेच्या शिक्षेतून मायलेकींची उच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता

October 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026