• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

ज्ञानाचा, शिक्षणाचा उपयोग राष्ट्राच्या वैभवासाठी करा-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील…

Yes News Marathi by Yes News Marathi
September 18, 2025
in इतर घडामोडी
0
ज्ञानाचा, शिक्षणाचा उपयोग राष्ट्राच्या वैभवासाठी करा-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील…
0
SHARES
1
VIEWS

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ उत्साहात…

सोलापूर – ज्ञान ही सर्वात मोठी संपत्ती आहे. आज विद्यार्थ्यांनी पदवी व पदविकेच्या माध्यमातून मिळवलेल्या ज्ञानाचा, शिक्षणाचा उपयोग हा राष्ट्राच्या वैभवासाठी करावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

गुरुवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा 21 वा दीक्षांत समारंभ विद्यापीठाच्या दीक्षांत मैदानात पार पडला. यावेळी मुख्य अतिथी म्हणून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे बोलत होते. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर हे होते. यावेळी गोवा उच्च शिक्षण परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. गोपाल मुगेराया यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे यांनी विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा सादर केला. प्रारंभी दीक्षांत मिरवणूक निघाली. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे हे ज्ञानदंड हाती घेऊन मिरवणुकीच्या अग्रभागी होते. यामध्ये विविध विद्याशाखेचे अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषद, विद्यापरिषद, अधिसभेचे सदस्य तसेच पदवी घेणारे स्नातक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी एकूण 10 हजार 955 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. याचबरोबर 89 संशोधक विद्यार्थ्यांना पीएच. डी पदवी तर 59 विद्यार्थ्यांना सुवर्णपदके देऊन सन्मानित करण्यात आले.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, अथक प्रवासातून पदवी मिळवणे हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील ऐतिहासिक टप्पा आहे. मिळवलेल्या पदवीचा केवळ नोकरीसाठी उपयोग न करता त्याचा समाज व देशाच्या वैभवासाठी होणे महत्त्वाचे आहे. ज्ञान हीच फार मोठी संपत्ती आहे. त्या बळावरच आपण आपल्या राष्ट्राचे नाव उंचावू शकतो. त्यासाठी संशोधनास प्रोत्साहन देण्याबरोबरच संशोधन अधिकाधिक करून नवीन ज्ञान मिळवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. राज्यात महाविद्यालयीन शिक्षकांची भरती ही लवकरच सुरु होईल, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. मुगेराया म्हणाले की, शिक्षण अशी एक गोष्ट आहे की, ती जीवन बदलून टाकते. शिक्षणाच्या जोरावरच आपण प्रगती साधू शकतो. त्यामुळेच तब्बल 33 वर्षानंतर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी देशात झाली. गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे फार महत्त्वाचे आहे. आज विद्यार्थ्यांनी कौशल्य व व्यावसायिक शिक्षण घेऊन नोकरी मागणारे न होता नोकरी देणारे बनावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कुलगुरू डॉ. महानवर म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आज पारंपरिक शिक्षण देण्याबरोबरच कौशल्य व व्यवसायाभिमुख शिक्षण देऊन रोजगारक्षम पिढी निर्माण करीत आहे. एका जिल्ह्यासाठी स्थापन झालेल्या या विद्यापीठाने उच्च शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान देऊन सोलापूरचे स्थलांतर थांबवले आहे. याचबरोबर विद्यापीठाने पाच लाख वृक्ष लागवडीचा संकल्प करून आतापर्यंत सव्वा लाख वृक्ष लावली आहेत. समाज आणि शिक्षण क्षेत्राचे नाते दृढ करण्यासाठी काही गावे दत्तक घेऊन तेथेही काम विद्यापीठाने सुरू केले आहे. विकसित विद्यापीठाचा संकल्प करून समाज उन्नतीसाठी विद्यापीठाने विविध प्रयोग राबवत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मानवविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. वसंत कोरे, वाणिज्य व व्यवस्थापन आणि विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी शिंदे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार, आंतरविद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. राजशेखर हिरेमठ यांनी स्नातकांना पदवी प्रदान करण्याची विनंती केली. त्यानंतर कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करत असल्याची घोषणा केली.

या कार्यक्रमास आमदार श्रीकांत भारतीय, भाजप शहर अध्यक्ष प्रा. रोहिणी तडवळकर, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजाभाऊ सरवदे, प्रा. देवानंद चिलवंत, प्रा. सचिन गायकवाड, माजी कुलगुरू डॉ. इरेश स्वामी, मोहन डांगरे, उदयशंकर पाटील, माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे, दयानंद संस्थेचे सचिव महेश चोप्रा, डॉ. बी. पी. रोंगे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. यशपाल खेडकर व डॉ. तेजस्विनी कांबळे यांनी केले.

Previous Post

सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप रचनेवर शेवटच्या दिवसापर्यंत विविध प्रभागातून आल्या 38 हरकती..

Next Post

राज्य सेवा स्पर्धा परिक्षेत मुलींमधे राज्यात प्रथम आलेल्या कु.अमृता बाबुराव ननवरे यांचा सत्कार

Related Posts

बाजार आवाराबाहेर फळे-भाजीपाला खरेदीसाठी परवानाच बंधनकारक
इतर घडामोडी

बाजार आवाराबाहेर फळे-भाजीपाला खरेदीसाठी परवानाच बंधनकारक

October 12, 2026
स्थानिक स्वराज्य संस्थांनी १६ ऑक्टोबरपासून पाणीवापरात १० टक्के कपात करावी; जिल्हाधिकारी
इतर घडामोडी

स्थानिक स्वराज्य संस्थांनी १६ ऑक्टोबरपासून पाणीवापरात १० टक्के कपात करावी; जिल्हाधिकारी

October 12, 2026
चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

October 10, 2026
सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!
इतर घडामोडी

सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!

October 10, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव
इतर घडामोडी

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

October 9, 2026
“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”
इतर घडामोडी

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

October 8, 2026
Next Post
राज्य सेवा स्पर्धा परिक्षेत मुलींमधे राज्यात प्रथम आलेल्या कु.अमृता बाबुराव ननवरे यांचा सत्कार

राज्य सेवा स्पर्धा परिक्षेत मुलींमधे राज्यात प्रथम आलेल्या कु.अमृता बाबुराव ननवरे यांचा सत्कार

ताज्या बातम्या

माढा तालुक्यातील तुळशी ग्रामस्थांकडून शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीचे स्वागत

माढा तालुक्यातील तुळशी ग्रामस्थांकडून शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीचे स्वागत

October 12, 2026
बाजार आवाराबाहेर फळे-भाजीपाला खरेदीसाठी परवानाच बंधनकारक

बाजार आवाराबाहेर फळे-भाजीपाला खरेदीसाठी परवानाच बंधनकारक

October 12, 2026
एकल महिलांचा सर्वे करण्यास सोलापूर महापालिका उदासीन…!

एकल महिलांचा सर्वे करण्यास सोलापूर महापालिका उदासीन…!

October 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026